जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ सप्टेंबर २०२३ सोमवार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि.१२ सप्टेंबर मंगळवार रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असल्याबाबत सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.सदरहू त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि.१२ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता शासकिय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने मौजे हडसन शिवार हेलीपॅड,ता.पाचोरा,जि.जळगावकडे प्रयाण.दुपारी १२.१५ वाजता मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथून मोटारीने एम.एम.कॉलेज मैदान पाचोराकडे प्रयाण.दुपारी १२.३० वाजता एम.एम.कॉलेज मैदान पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती,दुपारी २.३० वाजता मोटारीने मौजे नांद्रा तालुकापाचोराकडे प्रयाण.दुपारी २.५० वाजता नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट कंपनीचे उद्घाटन व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मौजे निंभोरा (नगरदेवळा रेल्वेस्टेशन जवळ),तालुका भडगाव,जि.जळगाव व पाचोरा नांद्रा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भुमीपुजन,दुपारी ३.३० वाजता मोटारीने मौजे हडसन शिवार हेलीपॅडकडे प्रयाण.दुपारी ३.४५ वाजता मौजे हडसन शिवार हेलीपॅड येथून हेलीकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण.दुपारी ४ वाजता जळगाव विमानतळ येथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण अशा दौऱ्याची रूपरेषा ठरविण्यात आली असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.