डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१६ सप्टेंबर २३ शनिवार
येथील ईनरव्हील क्लबतर्फे गतवर्षीप्रमाणे यंदाही मंगळागौर समूह नृत्य स्पर्धा संपन्न होऊन या स्पर्धेत नारीशक्ती गृपने प्रथम क्रमांक पटकावला तर ‘तरबाईपण भारी देवा’ गृपने द्वितीय तर पार्लर असोसिएशन गृपने तृतीय क्रमांक पटकावला.सालाबादाप्रमणे यंदाही नगरपालिका नाट्यगृहामध्ये सदरील “रंगीला सावन” कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमात शहर व तालुक्यातील अनेक महिला व युवती गृप यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी मंगळागौर स्पर्धा गटात रिदम गृप व आदिशक्ती ग्रुप यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली तसेच गृपडान्स स्पर्धा गटात सिनिअर लेडीज गृपने प्रथम तर लाडवंजारी गृपने द्वितीय तर अप्सरा गृप व बाईपण भारी देवा गृप यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमाचा शुभारंभ डिस्ट्रिक्ट चेअरमन शिलाताई देशमुख यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आला.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी डिसी अश्विनी गुजराथी,प्रभाबेन गुजराथी उपस्थित होते तर स्पर्धा परिक्षक म्हणून शिलाताई देशमुख,अवनी गुजराथी यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वीते करीता क्लब अध्यक्ष मीना पोतदार,सचिव नितु अग्रवाल,सीसी डॉ.कांचन टिल्लू,प्रोजेक्ट चेअरमन अंजली देशमुख,कल्पना जाधव,पुनम गुजराथी,निता अग्रवाल,वंदना पाटील,चेतना बडगुजर,सिमा पाटील,सोनल जैन,रूपाली पाटील,सोनल शहा आदी क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.सदरील कार्यक्रमास हजारांहून अधिक महिला ,युवती उपस्थित होत्या.