Just another WordPress site

आगामी सण व उत्सव शांततेत साजरे करण्याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे आवाहन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ सप्टेंबर २३ शनिवार

आगामी काळात येणारे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यात यावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी यावल पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित शांतता समिती सदस्यांचे बैठकीत नुकतेच केले आहे.यावल येथील धनश्री चित्र मंदीरच्या सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,पोलीस उपविभागीय अधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहिली.

दरम्यान आगामी गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद व नवरात्री उत्सव शांततेत पार पडावे यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील पोलीस पाटील तसेच उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली.दरम्यान आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे आपण विविध जाती धर्मानुसार सण उत्सव साजरे करीत असतो त्यानुसार आपण सर्व भारतीय समजून एकमेकाचे उत्सव शांततेत व उत्साहात पार पडतील व कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची आपण प्रत्येकाने दक्षता घ्यावी परिणामी आगामी उत्सव हे शांततेत पार पडतील असा आत्मविश्वास अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी यावेळी व्यक्त केला.सदर बैठकीत पोलीस उप अधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,हाजी शब्बीर खान,जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकर सोनवणे,डॉ.निलेश गडे,पोलीस पाटील संघटनेचे ज्ञानेश्वर महाजन आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रसंगी मंडळ पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विसर्जन मिरवणुकीतील शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्याच्या सूचना मांडल्या असता या सूचना संबंधित विभागाकडे पाठवून विसर्जन मिरवणुकीपूर्वी तक्रारी दूर करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मंडळांना आश्वस्त केले.सदरील बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी,पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे,पोलिस उप निरिक्षक मुजफ्फर पठाण,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील व यावल तालुक्यातील विविध गावातील पोलीस पाटील व शांतता समिती सदस्य मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.