Just another WordPress site

सहाय्यक पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची तेल्हारा येथे गुटखा माफियावर धडाकेबाज कारवाई

गुटखा माफियाकडून ११ लाख रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा माफियाच्या मुसक्या आवरून केले जेरबंद

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.१६ सप्टेंबर २३ शनिवार

तेल्हारा येथे दि.१४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक रितू खोखर या पोलीस निरीक्षक सचिन यादव,पोलीस कॉन्स्टेबल संतोष मेंहगे,नापोकॉ कादिर सलीम,पोलीस कॉन्स्टेबल सलीम शेख,सलीम अमीर,अभिजीत पांडे,पोलीस कॉन्स्टेबल गौरव डाबेराव यांच्यासह पोलीस स्टेशन परिसरात पोळा उत्सवनिमित्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपाल टॉकीज परिसरातील गुटखा विक्रेते रवी हरिचंद्र फुलवंदे वय २९ वर्षे यांच्या घर दुकान व गोदाम अशा तीन ठिकाणाहून तब्बल ११ लाख १७ हजाराचा गुटखा जप्त करून गुटखा माफियावर सर्वात मोठी धडाकेबाज कारवाई केली आहे.सहाय्य पोलीस अधीक्षक रितू खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांनी केलेल्या या कारवाईबद्दल जिल्ह्याभरात कौतुक होत असून गुटखा माफियांचे या कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि,सहाय्य पोलीस अधीक्षक रितू खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे गोपाल टॉकीजमागे एका घरामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला विक्रीसाठी आणून ठेवलेला आहे अशा गोपनीय माहितीवरून पोलीस स्टाफ सह रेड करण्याकरिता दोन पंचांना सोबत घेऊन गोपाल टॉकीज मागे तेल्हारा येथील रवी हरिचंद्र फुलवंदे यांच्या घरातुन दुपारी ४.१५ वाजता खोलीच्या कोपऱ्यात पांढऱ्या रंगाच्या काही लाल रंगाच्या पोतड्या दिसून आल्या त्यांची  पंचाक्षमक पाहणी केली असता त्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाल्याच्या पांढऱ्या कट्ट्यामध्ये ९८८ पाकिटे प्रति पाकीट किंमत ३३ रुपये प्रमाणे एकूण किंमत आठ हजार नऊशे दहा रुपये,छोटी विमल पान मसालाचे लाल तंबाखूचे पांढऱ्या पट्ट्यामध्ये १२३५ पॅकेट ३७०५० रुपये, पान बहार पांढऱ्या कट्ट्यांमध्ये ५०० पाकीट प्रति पाकीट किंमत २२५ रुपये एकूण किंमत एक लाख बारा हजार पाचशे रुपये,पानपराग तंबाखूचे पांढरे १३ कट्टे प्रति कट्ट्यात शंभर पाकिटे एकूण पाकीट १३०० प्रति पाकीट किंमत तीस रुपये एकूण किंमत ३९ हजार रुपये,वाहन मसाला पांढऱ्या पट्ट्यामध्ये एकूण ६४० प्रति पाकीट किंमत १२० रुपये एकूण किंमत ७६ हजार ८०० रुपये,डब्ल्यू तंबाखूचे पांढऱ्या काट्यात २१८ पॅक पाकीट किंमत तीस रुपये एकूण किंमत सहा हजार पाचशे चाळीस रुपये,विमल पान मसाला बॉक्स वाली पन्नास रुपये वाली एकूण पाकीट दहा पांढऱ्या कट्ट्यामध्ये १०० पॅक पाकिटे प्रति पाकीट ४७० रुपये एकूण किंमत ४७ हजार रुपये,बहार खानदानी पान मसाला २८६ पाकीट पांढऱ्या कट्ट्यामध्ये प्रति पाकीट किंमत १२० रुपये एकूण किंमत ३४ हजार ३२० रुपये,बहार तंबाखू पांढऱ्या कट्ट्यामध्ये २९८ पाकीट किंमत तीस रुपये एकूण किंमत ८९४० रुपये,प्रीमियम नजर मटका पांढऱ्या पट्ट्यात ११९ पाकिटे प्रति पाकीट किंमत दोनशे रुपये एकूण किंमत २३ हजार ८०० रुपये,बापोली जाफरानी जळगाव सुगंधी तंबाखू बॉक्समध्ये पांढऱ्या पट्ट्यात एकूण ९५० पाकीट प्रति पाकीट किंमत दोनशे रुपये किंमत एक लाख ९० हजार रुपये,बाजीराव गोल्ड पान मसालाचे पांढऱ्या कट्ट्यामध्ये एकूण ५१० पाकीटे प्रति पाकीट किंमत १२० रुपये एकूण किंमत ६१२०० रुपये,राजवाडा बादशाही पान मसाला पांढऱ्या पट्ट्यामध्ये एकूण तीनशे पाकीट पाकीट किंमत १२० रुपये एकूण किंमत ३६ हजार रुपये,आर्केडी तंबाखूचे २२० पाकीट प्रति पाकीट किंमत तीस रुपये एकूण किंमत सहा हजार सहाशे सतरा रुपये,राजनिवास सुगंधी पान मसाला पांढऱ्या कट्ट्यामध्ये १०३ पाकीट किंमत १९२ रुपये एकूण किंमत एकोणीस हजार सातशे शहात्तर रुपये किंमत ४८ हजार २७२ रुपये १९ रुपये,रजनीगंधा सुगंधित पान मसाला बॉक्समध्ये पांढऱ्या पोत्यात शिवून ठेवलेले बॉक्समध्ये डब्बा पॅक आठ बॉक्स एका बॉक्समध्ये दहा डबे प्रसिद्ध किंमत ३५० रुपये किंमत ३५५०० एकूण किंमत २८ हजार रुपये,रजनीगंधा सुगंधित पान मसाला पाऊचमध्ये आठ बॉक्स प्रति बॉक्स किंमत एक हजार एकशे वीस रुपये एकूण किंमत आठ नऊशे साठ रुपये,पानपराग पान मसाला मिनी पॅक ३३ पाकीट प्रति पॅकेज किंमत २५० रुपये एकूण किंमत आठ हजार २५० रुपये,पानपराग एक्स्ट्रा प्लस किंमत १७६ रुपये एकूण किंमत २७ रुपये असा एकूण ११ लाख १७ हजार ७२४ रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केला अन्नपदार्थ गुटखा पान मसाला तंबाखू जप्त करून सर्वात मोठी कारवाई करण्यात यश मिळविले आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी पंचनामा कार्यवाहीप्रमाणे जप्त करून माल ताब्यात घेण्यात आला आहे.

सदरहू रवी हरिचंद्र फुलवंदे वय २९ वर्ष राहणार गोपाल टॉकीज मागे तेल्हारा यांनी त्यांचे घरात स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता शासनाने प्रतिबंधित केलेल्या मानवी आरोग्यास उपाय करणारा तंबाखूजन्य सुगंधी गुटखा पान मसाला पदार्थ विक्रीकरिता बाळगून तो त्यांच्याकडे मिळून आल्याने त्याचे विरोधात हेड कॉन्स्टेबल गजानन श्रीराम इंगळे पोलीस स्टेशन तेल्हारा जि.अकोला यांनी फिर्याद दिल्यावरून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३०(२ )(अ) सहवाचन ३(१ )(zz)(v)कलम २६ (१)२६(२)(iv) २७( ३)(d) सहवाचन विनिमय २०११ (विक्री वरील प्रतिबंध व निर्बंध) चे विनिमयन २,३,४ व विनिमय २०११(अन्नपदार्थ व मिश्रके) विनिय मन ३:१७ चे उल्लंघन करून शिक्षा पात्र कलम ५९ व भादवी कलम ३२८,१८८,२७२,२७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्य पोलीस अधीक्षक रितू खोखर व उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट तसेच पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कायंदे करीत आहे.सदरहू आरोपी रवी हरिचंद्र फुलवंदे यांना अटक करण्यात आली असून त्यांना दि.१५ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदरील कारवाईमुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून सातत्याने अशीच कारवाई पुढेही सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी तालुकाभरातुन केली जात आहे.तसेच अजूनही अनेक गुटखा माफिया कार्यरत असल्याची चर्चा शहरामध्ये चर्चिली जात असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरवासियांमधून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.