अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची यावल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पंचानामे करावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्यासह तालुक्यातील इतर पदाधिकारी व शेतकरी यांनी तहसीलदार यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि.१६ सप्टेंबर रोजी यावल तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने तापी नदीला महापुर आल्याने तापी काठावरील भालशिव,पिंप्री,टाकरखेडा व बोरावल या शिवारातील शेतामधील पिकांचे आतोनात नुकसान झाले असून महसुल प्रशासनाने तात्काळ या परिसरातील नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करावे व शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीने तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.प्रसंगी सदरील मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना नुकतेच देण्यात आले.यावेळी तुषार उर्फ मुन्ना पाटील,माजी मसाका संचालक सुभाष आप्पा साळुंके,आंनदा कोळी,कैलास कोळी,विश्वनाथ कोळी,मनिष कोळी,राजु कोळी,वसंत तायडे, नारायण कोळी,नथ्थु कोळी,चिंतामण तायडे,आनंदा तायडे यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.