यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ सप्टेंबर २३ गुरुवार
तालुक्यातील किनगांव येथे “गाव तेथे शाखा व गाव तेथे कार्यकर्ता” उपक्रमाअंतर्गत वंचित बहुजन महिला आघाडी शाखेचे उद्दघाटन व नामफलक अनावरण कार्यक्रम दि.२० सप्टेंबर बुधवार रोजी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वंचित बहुजन आघडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून तालुक्यात मरगळलेळी वंचित जनता पुन्हा सतेज करत “गांव तेथे शाखा व गाव तेथे कार्यकर्ता” स्थापन करून आगामी होणाऱ्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्हा प्रभारी रविकांत वाघ व जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रतिभाताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापनेसह गावात नामफलक अनावरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.यावल तालुक्याच्या वंचितच्या इतिहासात पहिल्या टप्यात प्रथमच तालुक्यात मोठया प्रमाणात गाव तेथे शाखा उघडली जात आहे त्यामुळे आता यावल तालुक्यामध्ये वंचितला राजकीय संजीवनी प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरील शाखा उद्दघाटन प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे,जिल्हा संघटक राजेंद्र बारी,छायाताई हिरोळे, संतोष तायडे,भुषण साळुंके,मेजर देवदत्त मकासरे,धीरज मेघे,किनगांव शहर अध्यक्षा मंगला सुनील कोळी,शहर उपाध्यक्षा मनीषा शरद अडकमोल,शाखा अध्यक्षा सबेरा गफुर तडवी,शाखा सचिव संध्या दत्तू भालेराव,शाखा कार्याध्यक्ष भारती संजय अडकमोल,शाखा सदस्य सपना नाना साळुंके,लता रघुनाथ बाविस्कर,यमुनाबाई युवराज भालेराव,सुशिलाबाई उत्तम भालेराव,माधुरी विनोद मेढे,रेखा रवींद्र अडकमोल, ताराबाई शामराव तायडे,मंडाबाई बापू सपकाळे,जनाबाई श्रावण सोनवणे,कल्पना मनोहर अडकमोल,रमाबाई राजू अडकमोल,पूजा संजय सोनवणे,शिंधुबाई दामू साळुंके,शीतल चेतन भालेराव,तेजल सुनील सोनवणे,हसिनाबाई गफुर तडवी,कल्पना सिद्धार्थ भालेराव,साधना गौतम निकम,ललिता राजू निकम,फरिदाबाई खाटीक,दिलीप सोनवणे,रोहन निकम,भुषण भालेराव,बाबुलाल पटेल,भानुदास महाजन यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले तर आभार भुषण साळुंके यांनी मानले.