Just another WordPress site

दारूड्याला वाचविण्याच्या प्रयत्नात यावल वड्री बसला अपघात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ सप्टेंबर २३ गुरुवार

तालुक्यातील यावल वड्री रस्त्यावर आज दि.२१ सप्टेंबर गुरुवार रोजी रस्त्याच्या मध्यभागी मोटरसायकल उभी करून झोपलेल्या दारूड्याला वाचविण्याकरिता एसटी बस रोडच्या खाली उतरल्याने झालेल्या अपघातात तिन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली असून मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत एसटी आगाराच्या सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी की,आज दि.२१ सप्टेंबर गुरुवार रोजी यावल एसटी आगारातील बस क्रमांक एमएच २०डी ९९७५ ही सकाळच्या सुमारास वड्री कडून प्रवाशी घेवुन यावलच्या दिशेने येत असतांना यावल शहरापासुन सुमारे एक किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेतचिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी मोटरसायकल रस्त्यावर लावून झोपलेला होता.प्रसंगी त्या दारूड्याला वाचविण्यासाठी यावल आगारातील चालक एस.एम.कोळंबे यांनी बस बाजुने काढण्याचा प्रयत्न केला असता अचानक बसचा तोल सुटल्याने एसटी बस खड्ड्यात जाऊन उतरल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.सदरहू सदरील अपघातात तिन
विद्यार्थीनी जखमी झाल्या असुन या तिघ विद्यार्थींचे एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.दरम्यान घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालुन पळ काढला असल्याची माहीती एसटीतील प्रवाशांनी सांगितले आहे.सदरील अपघाताची माहीती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ जखमी रूग्णाची भेट घेऊन आस्थेवाईक पणे चौकशी करीत त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय मदत जाहीर केली आहे.सदर घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.