यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ सप्टेंबर २३ शुक्रवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत यावल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून भारतीय जनता पक्ष आणी भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० सप्टेंबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदरील रक्तदान शिबिराला युवकांनी मोठया संख्येने केलेल्या रक्तदानामुळे या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबीरात भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेत एकुण ७३ रक्त्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबीरास पक्षाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील,माजी सभापती नारायण चौधरी, जिल्हा परिषद माजी सदस्या सविता भालेराव,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जेन्सिंग राजपूत,भाजयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश फेगडे,दहिगाव उपसरपंच देविदास पाटील,पंकज चौधरी,निलेश गडे,अजय भालेराव, किशोर कुलकर्णी,शरद तायडे,व्यंकटेश बारी,योगेश खेवळकर,नितीन सपकाळे,जयेश चौधरी,ईश्वर कोळी,सचिन चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिबीर यशस्वीते करिता प्रयत्न केले.