Just another WordPress site

यावल शहराच्या विकासाकरीता साडे तिनकोटी निधी त्वरीत खर्च करण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ सप्टेंबर २३ रविवार

येथील तहसील कार्यालयात २२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल कार्यालयासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील विकास कामाचा आढावा घेतला.या बैठकीस प्रांताधिकारी कैलास कडलक व तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे सह विविध शासकीय कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.सदर बैठकीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत तालुक्यातील शासकीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की,कृषी गणनामध्ये यावल तालुका राज्यात सर्वप्रथम असून सातबारा संगणक संगणकीकरणातही अव्वल आहे.त्याचबरोबर पीक पाहणी जवळ जवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर असून ती लवकरच शंभर टक्के पूर्ण होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावर्षी शेळगाव बॅरेज प्रकल्पातून गाळ उपसा होणार असल्याने गौण खनिज वसुलीतही तालुका अग्रेसर राहील असे त्यांनी सांगीतले.तसेच आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावल तालुक्यात दोन ते तीन नवीन मतदान केंद्र वाढणार असल्याचे सांगून प्रांत अधिकारी कैलास कडलक आणी संबंधित अधिकाऱ्यांसह मतदान केंद्राची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तहसील कार्यालयातील एकूण सर्व काम पाहता तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांचे व त्यांच्या सर्व सहकार्याचे त्यांनी विशेष कौत्तुक करून अभिनंदन केले आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथील पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस ठाण्यात कमी पडत असलेल्या इमारतीसाठी जुन्या तहसील कार्यालयातील दोन ते तीन खोल्याखाली करून देण्याचे तहसीलदार यांना आदेश दिले.यानंतर आयुष प्रसाद यांनी येथील नगरपरिषदला भेट देऊन नगरपरिषदच्या सर्व विभागाच्या कामाचा आढावा घेतला.याप्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की,शहरात फिरत असलेल्या घंटागाडीचे वेळापत्रक तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी ते जाहीर करा तसेच  माझी वसुंधरा अंतर्गत डेटा एन्ट्रीकडे लक्ष देऊन वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन,शहरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी एक दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्याची सूचना तसेच पालिकेच्या वसुलीबाबत त्यांनी सक्त ताकीद देत शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश देत मागील दोन ते तीन वर्षाची थकबाकी सप्टेंबरपर्यंत तर नियमीत वसुली आक्टोबर अखेरपर्यंत करण्याच्या सूचना यांच्यासह १५ वित्त आयोगातील साडे तिनकोटी रूपयांचा निधी शिल्लक असुन या निधीचा शहरातील मागासवर्गीय वस्ती तसेच विविध समाजघटकांच्या विकास कामात तात्काळ खर्च करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले.
या बैठकीला पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,नायब तहसीलदार मनोज खाखारे,गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,बाल विकास बाल व महिला विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोले,सार्वजनिक बांधकाम विभागा उपविभागीय अधिकारी जहागीर तडवी,पुर्व विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभागाचे अजय बावणे,आदिवासी प्रकल्प विभाग सहाय्यक अधिकारी प्रशांत माहुरे,नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम,पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर,फैजपूर सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश वाघ,पश्चिम वनविभागाचे वन परिक्षेत्रपाल सुनील भिलावे,कृषी अधिकारी सागर सिनारे यांच्यासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील प्रमुख उपस्थित होते.प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे येथील तहसील कार्यालयाच्यावतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आर.के.प्रभू यांचे व्दारे लिखित ‘ मोहनमाला ‘ हे पुस्तक देऊन स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.