चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील पदविका औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये इंडक्शन प्रोग्राम उत्साहात
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२४ सप्टेंबर २३ रविवार
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रथम वर्ष डी.फार्मसीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसांचा प्रेरक कार्यक्रम नुकताच राबवण्यात आला.यानिमित्ताने दि.२३ सप्टेंबर २०२३ रोजी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले.सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.गौतम वडनेरे होते.प्रसंगी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्दघाटन करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख प्रा.पियुष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पदविका औषध निर्माणशास्त्रचा अभ्यासक्रम,ग्रंथालय व विद्यालयात राबविण्यात येणारे उपक्रम यासंदर्भात माहिती दिली तर प्रा.पवन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे नियम,अटी व हजेरीचे महत्व स्पष्ट केले व विद्यार्थिना आपल्या पालक शिक्षकांची ओळख करून दिली तसेच प्रा.अमित पाटील यांनी परीक्षा पद्धती बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तर समन्वयक प्रा.सुधीर पाटील यांनी विभागासंबंधी अभ्यासक्रम,प्रयोगशाळा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.त्याचबरोबर त्यांच्या शंकाचे निरसन करून विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गौतम वडनेरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचा अभिप्राय घेतला.विद्यार्थ्यांनी फार्मसी शिकतांना ते आनंद घेत शिकावे व ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने प्रयत्न करावे, आयुष्यात चढ-उतार येत राहतात त्यातून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी आयुष्य जगावे असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पियुष चव्हाण यांनी केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष आशाताई पाटील,सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील,प्राचार्य.डॉ.गौतम वडनेरे,रजिस्टर प्रफुल्ल मोरे व सर्व शिक्षक यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.