Just another WordPress site

शेळगाव बॅरेजच्या तापी नदीकाठावर हरविलेल्या महिलेचा मृतदेह आढळला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार

भुसावळ शहरातील द्वारका नगरातील रहिवासी सुरेखा जितेंद्र उईके (वय ४४) वर्षे या महिलेचा मृतदेह यावल- जळगाव तालुक्याच्या सीमेवरील असलेल्या शेळगाव बॅरेज तापी नदीच्या किनाऱ्यावर नुकताच आढळून आला आहे.याबाबत मृतक महिलेचे पती जितेंद्र उईके यांनी खबर  दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत जितेंद्र उईके यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे की,मयत पत्नी सुरेखा जितेंद्र उईके ही दि.२३ सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी काही एक न सांगता निघून गेल्या होती.दरम्यान सदर महिलेची स्कुटी ही भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावर आढळून आली होती.याबाबत भुसावळ शहरच्या पोलीस ठाण्यात सदर महिला हरविल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.दरम्यान दि.२४ सप्टेबर रविवारी सकाळी महिलेचा मृतदेह शेळगाव बॅरेजच्या किनाऱ्यावर आढळून आला.यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी केले.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.सदर मयत महीला सुरेखा उईके यांना एक मुलगा,एक मुलगी,पती असे कुटुंब असुन दरम्यान सदर महीलेने आत्महत्या का केली याचे कारण मात्र स्पष्ठ होवु शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.