यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.२५ सप्टेंबर २३ सोमवार
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे संपन्न झाल्या जिल्हास्तरीय शालेय आट्या-पाट्या स्पर्धेत इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथील १४ वर्षाखालील वयोगटात किनगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरसोली येथील संघाला १ गुणाने तर अंतीम सामन्यात अमळनेरच्या संघाचा १४ गुणांनी पराभव करत विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.
सदरील स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडुंना क्रीडा शिक्षक व यावल तालुका क्रीडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस अधिक्षक एम.राजकुमार,ह.भ.प.जळकेकर महाराज,जिल्हा क्रिडा अधिकारी रवि नाईक,तालुका क्रिडा अधिकारी गुरूदत्त चाैहान,जगदिश चाैधरी,सुजाता घुलाने व अट्यापाट्या संघटनेचे अनिल माकडे यांची उपस्थीती लाभली.सदरहू उपस्थित मान्यंवरांनी सर्व खेळाडुंचे कौतुक केले आहे.इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या यशस्वी खेळाडूंचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,व्हा.चेअरमन शैलेजाताई विजयकुमार पाटील,सचिव मनिष विजकुमार पाटील,व्यवस्थापक पुनम मनिष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडुंचे अभिनंदन करीत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.