“प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा याकरीता प्रत्येक घरातील आईने मुलांना माता जिजाऊ होवुन तसे संस्कार द्यायला हवे”-सायली महाजन यांचे प्रतिपादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ सप्टेंबर २३ मंगळवार
प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा याकरीता प्रत्येक घराघरात जिजाऊ असणे गरजेचे आहे तसेच माता जिजाऊ यांचे संस्कार प्रत्येक मातेने आपल्या मुला-मुलींना द्यावेत व शिवाजी महाराजांसारखे मुलांना घडवावे असे आवाहन भुसावळ येथील सायली महाजन यांनी नुकतेच प्रतिपादन केले आहे.सायली महाजन या तालुक्यातील दहिगाव येथील सनातन एकता गणेश मंडळ यांनी आयोजित केलेल्या ‘एक गाव एक गणपती’ कार्यक्रमानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपस्थित जनसमुदायासमोर केले आहे.
तालुक्यातील दहिगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून दहा ते पंधरा गणेश मंडळ गणरायाची स्थापना करण्यात येत होती.परंतु यावर्षी संपुर्ण गावाने अध्यात्मिक मार्गाचा वसा घेऊन गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना घेत संपूर्ण गावात फक्त एक गाव एक गणपतीची स्थापन केली. यानिमित्ताने लोक प्रबोधनाचे विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने ठरविण्यात असून या कार्यक्रमात हिंदू संस्कृती कशी जोपासली जाईल? याकरिता अनेक व्याख्यान दातांचे मार्गदर्शन लाभत आहे.दरम्यान सायली महाजन यांनी शिवचरित्र आणि आजची पिढी व उद्याची पिढी याबाबत मार्गदर्शन केले तसेच मातांनी मुलींना मोकळे शिक्षण द्यावे मात्र त्यांचे वर महिला सक्षम कशी होईल हे संस्कार घडवावे आणि प्रत्येक मुलगी ही स्वावलंबी व्हावी याचे शिक्षण देण्यात यावे.त्याचबरोबर आपण पूर्वी कसे होतो याचा विचार अंगी न बाळगता सध्याची परिस्थिती कशी आहे यावर आधारित आपल्या मुलींना सुसंस्कृत करावे तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना देखील तशी शिकवण द्यावी दरम्यान एकत्रित कुटुंब पद्धत टिकवून ठेवावी व हिंदू संस्कृती कशी जोपासली जाईल तसेच हिंदू एकता कशी राहील याची दखल घ्यावी असेही सायली महाजन यांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अजय पाटील केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष आकाश महाजन व त्यांचे सर्व सहकारी व युवकांनी परिश्रम घेतले.