Just another WordPress site

जागतिक रेबीज दिनानिमित्त चोपडा येथे मोफत लसीकरण शिबीर उत्साहात

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२७ सप्टेंबर २३ बुधवार

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व केंद्र पुरस्कृत आस्कॅड योजना अंतर्गत सन २०२३-२४ अंतर्गत आज दि.२७ सप्टेंबर बुधवार रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त डॉ.अनिल शिंदे सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहरासह तालुक्यातील अनेक खेडेगावांमधील कुत्री व मांजरे संवर्गातील प्राण्यांवर रेबीज लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.दरम्यान सदरील मोहिमेत पशुपालकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला त्यामुळे पशुपालकांनी आपआपली कुत्री व मांजरे स्वयंस्फुर्तीने केंद्रावर आणून रेबीज लसीकरण करून घेतले.
याकामी पशुधन विकास अधिकारी लघु चिकित्सालय चोपडा डॉ.सायली गोसावी,डॉ.सतीश भदाणे,डॉ.पंकज सौदाने यांच्या वतीने जवळपास ५०-६० मांजरे व कुत्र्यांना जागतिक रेबीज दिनानिमित्त आयोजित शिबीरात मोफत लसीकरण करण्यात आले.यावेळी डॉ.अनिल शिंदे सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा व डॉ.सायली गोसावी यांनी पशुपालकांना कुत्रे व मांजरे पाळतांना घ्यावयाची काळजी,रेबीज लसीकरणाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.सदरील शिबिरात कुत्री,मांजरे जंतनिर्मूलन,लसीकरण तसेच रेबीज आजाराविषयी जागृती करण्यासाठी आली.

Leave A Reply

Your email address will not be published.