Just another WordPress site

यावल येथील आश्रय फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण पुरक गणपती सजावट स्पर्धा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ सप्टेंबर २३ शुक्रवार

येथील आश्रय फाउंडेशन व डॉ.कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धे निमित्ताने  पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदरील स्पर्धा ही दि.२० सप्टेंबर ते २८ सप्टेंबर गुरुवार या दरम्यान घेण्यात आली.दरम्यान या स्पर्धस मोठा प्रतिसाद मिळुन खूप मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत सहभागी झालेल्या पहिल्या तीन स्पर्धाकांना बक्षीस व प्रमाणपत्र व इतर सहभागी स्पर्धाकांना देखील प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धत प्रथम क्रमांक दिपक सोपान पाटील,द्वितीय क्रमांक संदिप धनशाम लोखंडे व तृतीय क्रमांक कुणाल शरद जोगी यांनी मिळविला.

सदरील स्पर्धा ही पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी,पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हे उदिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन आयोजित करण्यात आली होती.संपूर्ण
महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या घरगुती गणेश उत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे.या उत्सवातून कौटुंबिक स्नेह जसा वृद्धिंगत होतो तसे सामाजिक बांधिलकीतून देश प्रेमाची भावना निर्माण होईल तसेच देशाप्रती असणारी राष्ट्रनिष्ठा सामाजिक जाणीवा प्रखर करेल याची पक्की खुणगाठ बांधत लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेचा अंगार फुलवण्यासाठी या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता,संकट विमोचक आणी पराक्रमी योद्धादेखील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्रीगणरायाच्या “आधी वंदू तुज मोरया”या प्रार्थनेने केली जाते कारण गणरायाचे पुजन म्हणजे मांगल्याची आरती म्हणुनच जशी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून पारतंत्र्याची लोकभावना जागृत केली आणि भारतीय स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले त्याचप्रमाणे वर्तमानात आपण सर्वानी बदलत्या हवामानाची,बदलत्या ऋतुचक्राची दखल घेण्यासाठी हा गणेश उत्सव पर्यावरण स्नेही साजरा करणे ही बदलत्या काळाची गरज आहे इतकेच नव्हे तर केवळ गणेश उत्सव हाच फक्त पर्यावरण पूरक साजरा न करता वर्षभरातील सर्व सण,उत्सव पर्यावरण स्नेही साजरे करण्याचा संकल्प व निश्चय आपण करूया असे आव्हान आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले.याप्रसंगी सुरेश फेगडे,चंद्रकांत नेवे,संदिप लोखंडे,दिपक सोपान पाटील,उज्वल कानडे,यश पाटील,कुणाल जोगी,याज्ञिका योगेंद्र महाजन हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.