यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ सप्टेंबर २३ शुक्रवार
तालुक्यातील भालोद येथील रहीवाशी कृषीमित्र माजी खासदार स्व.हरीभाऊ माधव जावळे यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे पिएम किसान योजनेपासुन वंचीत शेतकऱ्यांना लाभ मिळवण्याच्या संदर्भात एक दिवसीय कार्य निराकरण व मार्गदर्शन शिबीर नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर शिबीरास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला व शेतकऱ्यांच्या पिएम किसान योजनांच्या अडचणी यावेळी सोडविण्यात आल्या.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पिएम किसान सन्मान योजनापासुन वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात आले.सदरील शिबीर हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या शिबीरामध्ये तालुक्यातील सुमारे ५५o च्यावर शेतकरी बांधवांनी या शिबीराचा लाभ घेतला.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल गोविंदा पाटील,उपसभापती दगडू उर्फ बबलु कोळी,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नारायण चौधरी,संचालक राकेश फेगडे,संचालक उज्जैनसिंग राजपुत,अशोक चौधरी,उमेश पाटील, सचिव स्वप्नील सोनवणे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,डॉ.कुंदन फेगडे,भाजयुवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी,जिल्हा परिषद माजी सदस्या सविता भालेराव यांच्यासह पदधिकारी आणि तालुक्यातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.शिबिर यशस्वीतेकरिता महसुल प्रशासन आणी तालुका कृषी विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले.