डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.६ ऑक्टोबर २३ शुक्रवार
तालुक्यातील वरगव्हन येथे काल दि.५ ऑक्टोबर गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखेचे मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आले.प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व पुण्यातील ख्यातनाम डॉ.रुस्तम नसीर तडवी यांनी त्यांच्या शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत नुकताच जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.सध्या वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नसल्याची मनीषा व्यक्त करीत डॉ.रुस्तम तडवी यांच्यासहित शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला हे विशेष !
सदरील कार्यक्रम यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे,जिल्हा प्रभारी ऍड.रविकांत वाघ,जिल्हा नेते विनोद सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष मोहमद शफी शेख,राजेंद्र बारी,जिल्हा संघटक बाबुलाल पटेल,शरद अडकमोल,रोहन निकम,भूषण साळुंखे,महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.प्रसंगी डॉ.रुस्तम तडवी व त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा प्रभारी ऍड.रविकांत वाघ यांनी डॉ.रुस्तम तडवी व त्यांच्या सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून बहुजन समाजाला जागृत करण्याचे तसेच वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्रातील तमाम निष्ठावंत कार्यकर्ते तन मन धनाने करत आहेत परिणामी लवकरच महाराष्ट्राला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चांगले दिवस पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.तर ‘गाव तिथे शाखा’ या माध्यमातून यावल तालुक्यातील किनगावपासून सुरवात झाली होती व आता हाच झंझावात संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या गावागावात चालू झालेला आहे याचा परिणाम आजच्या कार्यक्रमातून दिसून येत असल्याचे यावल तालुकाध्यक्ष भगवान मेघे यांनी यावेळी म्हटले आहे.सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर रुस्तुम तडवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की,आता वंचित बहुजन आघाडीशिवाय तडवी समाजासह सर्वांना कोणताही पर्याय नसून हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगताच उपस्थितांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.प्रसंगी “वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद”, “वंचित बहुजन आघाडीचा विजय असो”, “श्रद्धेय बाळासाहेब यांचा विजय असो”, “रुस्तम भाई तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है”अशा घोषणा घोषणा देण्यात आल्या.यावेळी पक्ष प्रवेश केल्यानंतर अनेक मान्यवरांनी पक्ष वाढीसंदर्भात आपआपली मते मांडली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तायडे यांनी केले तर आभार यावल तालुका अध्यक्ष भगवान मेघे यांनी मानले.