Just another WordPress site

चोपडा शहरातून भरदिवसा दुचाकीला टांगलेली अडीच लाख रुपयांची बॅग लंपास

डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.७ ऑक्टोबर शनिवार

चोपडा शहरातील मेन रोडवर काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी शहरातील शनी मंदिरासमोर समीक्षा ड्रायफ्रूट या दुकानावर महेश पतसंस्थाचे कर्मचारी शरद रामदास बाविस्कर हे नेहमीप्रमाणे पैसे घेण्यासाठी आले होते.दरम्यान शरद बाविस्कर हे एचआर पावती फाडण्यासाठी गेले असता दुचाकीला लागलेली बॅग घेऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.सदरहू महेश पतसंस्थेतून वितरण केलेले किरण शिंपी यांचे १ लाख रुपये आणि शरद बाविस्कर यांचा पगार असे एकूण २ लाख ३० हजार रुपये रोख लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.याबाबत चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,महेश पतसंस्थेचे कर्मचारी शरद रामदास बाविस्कर वय ३८ धंदा पिग्मी एजेंट यांच्या मालकीची मोटार सायकल क्रमांक एम एच- १९,डिवाय-८४७५ हिचे हॅन्डलला लटकवीलेल्या बॅग मध्ये महेश पतसंस्थेतून वितरण केलेले किरण शिंपी यांचे १ लाख रुपये आणि शरद बाविस्कर यांचा पगार असे एकूण २ लाख ३० हजार रुपये अशी रोकड त्या बॅग मध्ये होती.सदरहू काल दि.६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी शहरातील शनी मंदिरासमोर समीक्षा ड्रायफ्रूट या दुकानावर महेश पतसंस्थाचे कर्मचारी शरद रामदास बाविस्कर हे नेहमीप्रमाणे पैसे घेण्यासाठी आले असतांना शरद बाविस्कर हे एचआर पावती फाडण्यासाठी गेले असता दुचाकीला लागलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली आहे.सदरील चोरटा हा बॅग घेऊन जात असतांना सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसून येत आहे.सदरील घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.