Just another WordPress site

धामणगांव बढे ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार शितल सपकाळ यांनी स्वीकारला  

सादिक शेख,पोलीस नायक

मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.९ ऑक्टोबर २३ सोमवार

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या धामणगांव बढे येथिल २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शितल मोहन सपकाळ यांना ९ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ८ मते मिळाल्याने सरपंचपदी शितल मोहन सपकाळ यांची निवड करण्यात आली होती.दरम्यान ७ ऑक्टोबर रोजी धामणगाव बढे ग्रामपंचायत सरपंचपदाचा पदभार नवनिर्वाचित सरपंच शितल मोहन सपकाळ यांनी स्वीकारला.

धामणगाव बढे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात शितल सपकाळ यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.याप्रसंगी गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासह गावाचा विकास करण्याकरिता प्रयत्नशील राहील तसेच गावची सेवा करणे हेच माझे आद्य कर्तव्य राहील असे नवनिर्वाचित सरपंच शीतल सपकाळ यांनी यावेळी बोलतांना सांगितले.प्रसंगी उपसरपंच भास्कर हिवाळे,ग्राम विकास अधिकारी पि.के.मोरे,माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडे,सरपंचपती मोहन सपकाळ,ग्रामपंचायत सदस्य भागवत दारखे,श्याम निमखेडे, रशिद पटेल,सय्यद बिस्मिल्ला,ऍड.वसीम कुरैशी,सुरेश सोनोने,दिपक भोरे,अशोक घोंगडे,गजानन भोरे,तिलक दांडगे,श्रीकृष्ण भोरे,ईसाक पटेल,राजू शिवाजी जाधव,अभिमन्यू सपकाळ यांच्यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.