Just another WordPress site

विद्यार्थ्यांना झोपायला वेळ मिळणार ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सुतोवाच

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करता सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे.शहरांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये शाळा सुरू असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय हा तज्ज्ञ,संस्थाचालक आणि शिक्षकांशी बोलून घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच दिली आहे.शिक्षकांना निवडणूक आणि जनगणनेची कामे वगळता इतर अशैक्षणिक कामे देण्यात येणार नाहीत असेही केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित शिक्षक संवाद आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी केसरकर बोलत होते.आमदार सिद्धार्थ शिरोळे,सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव आदी उपस्थित होते.यावेळी शिक्षकांनी वेतनेतर अनुदान,अशैक्षणिक कामे,परीक्षा सुरू करा,अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण आणा,छत्रपती शिवाजी महाराज ते महादजी शिंदे यांचा इतिहास सामाविष्ट करा,क्रीडा धोरण अशा विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

केसरकर म्हणाले लहान मुलांना झोपेची जास्त आवश्यकता असते.या मुलांची शालेय जीवनातील सुरुवातीची वर्षे महत्त्वाची असून या काळातच मेंदूचा जास्त विकास होतो.मात्र राज्यात शाळांच्या वेळा सकाळी सात वाजेपासून असून अभ्यासाच्या दडपणामुळे मानसिक ताण जादा येतो.त्यामुळे या मुलांची व्यवस्थित झोप होऊन त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याची आवश्यकता आहे.या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे.याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यापुढे शिक्षकांना केवळ निवडणूक आणि जनगणनेशी संबंधित कामे देण्यात येणार आहे.ही कामे देण्यापूर्वीही महसूल विभागात कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेण्यात येईल.त्यानंतरच ही कामे देण्यात येतील.असेही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.बदलत्या काळानुसार राज्याच्या शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य पातळीवर सल्लागार समिती किंवा मंडळाची स्थापना करण्याची आवश्कता आहे.त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता उत्तम ठेवणाऱ्या शाळांना स्वायत्त दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा अशी भूमिका डॉ. एकबोटे यांनी मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.