यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार
तालुक्यातील चुंचाळे येथील शिवारातील ग्रामपंचायतच्या विहिरीत पडून एका प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाल्याची नुकतीच घटना घडली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवाशी विठ्ठल प्रल्हाद धनगर वय ४९ वर्ष यांचा येथील शिवारातील ग्रामपंचायतीच्या विहीरीत दि.१६ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास गाव शिवारातील ग्रामपंचायतच्या विहीरीवर पाणी भरत असतांना अचानक पाय घसरून पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.याबाबत मयताचा पुतण्या किशोर अशोक धनगर यांनी यावल पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून यावल पोलिसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मयत विठ्ठल धनगर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी केले.सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.