Just another WordPress site

डिगंबर तायडे यांनी गगन भरारी घेत रोवला डोंगर कठोरा वासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा

संपूर्ण भारतात फिनॅामीनाल म्युजीक ग्रुपतर्फे आयोजित गायन स्पर्धेत मिळविला अव्वल क्रमांक

मिनाक्षी पांडव ,पोलीस नायक

मुंबई विभागीय प्रमुख

दि.१९ ऑक्टोबर २३ गुरुवार

कठोरा येथील सर्व लहान थोरांचे परीचीत आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई स्थित मुंबई प्रधीकरणात सीव्हील इंजीनीयर म्हणुन कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले डिगंबर सिताराम तायडे यांनी फिनॅामीनाल म्युजीक ग्रुपतर्फे संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतीयोगीता स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा अशा  डोंगर कठोरा खेडेगावातील बांधवांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सदरहू डिगंबर तायडे स्पर्धा जिंकल्याबद्दल समस्त कठोरकर बांधवांचा हा सत्कार असल्याचे मानले जात आहे.

सदरील स्पर्धा हि फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप तर्फे संपूर्ण भारतात घेण्यात आली व यादरम्यान ज्यास्तीत ज्यास्त लाईक करण्यात आलेल्या गाण्याची निवड हि अंतिम विजेत्याच्या रूपाने त्यांच्याकडून करण्यात आली.दरम्यान तीन राउंडमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत डिगंबर तायडे यांनी गायिलेल्या गाण्याने दोन दिवसात ५५० लाईक मिळविले.परिणामी यात डिगंबर तायडे यांनी गायिलेल्या मुकेशजी यांच्या “ओ तेरे प्यार का गम ” सुमधुर गाण्याने आकाशाला गवसणी घालीत भारत भरातून आलेल्या प्रतियोग्यांमधून प्रथम क्रमांक पटकाविला.सदरील त्यांच्या यशामुळे डोंगर कठोरा वासियांची मान उंचावली आहे.या यशात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी शकुंतला डिगंबर तायडे यांचा मोलाचा हातभार लाभला आहे.सदरील स्पर्धा डिगंबर तायडे यांनी स्वतःच्या मेहनतीवर जिंकली असून देखील त्यांनी या यशाचे श्रेय्य समस्त कठोरकर बांधवांचे असून यापुढील आपले संपूर्ण आयुष्य डोंगर कठोरा गावच्या विकासाकरिता वाहून घेण्यात येईल अशी भावना त्यांनी आपल्या निवडीबद्दल व्यक्त केली आहे.डिगंबर तायडे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर संपूर्ण भारतभरातून तसेच नातेवाईक,आप्तस्वकीय व मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.