Just another WordPress site

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून यावल नगरपालिकेची वाढीव पाणीपट्टी रद्द

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० ऑक्टोबर २३ शुक्रवार

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांना बसणाऱ्या वाढीव पाणीपट्टीचा भुर्दंड अखेर नगरपालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून येथील शहरातील विस्तारित कॉलनी भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यात येथील नगरपालिकेच्या माध्यमातून तडवी कॉलनी भागात पाणीपुरवठा करण्याकरिता १० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला असून पाणी वितरणासाठी पाईपलाईन सुद्धा टाकून ठेवलेली आहे.पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्या भागातील नागरिकांनी अधिकृत रक्कम भरणा करून व आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा करून नळ जोडणी केली होती मात्र मार्च २०२२ पर्यंत पाइपलाइनद्वारे नवीन नळ धारकांना पाणी पुरवठा झालेला नव्हता परिणामी अशा ३२८ नळधारकांना पाणीपट्टी शुल्क आकारू नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दि.१७ मार्च २०२२ रोजी पत्र देऊन केली होती.सदरहू अतुल पाटील यांची हि मागणी मंजूर देखील करण्यात आली होती.त्याप्रमाणे मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता पालिकेने दिलासा दिला होता.पण यंदा सन २०२३-२४ मध्ये पालिकेने पाठविलेल्या पाणीपट्टी बिलात मागील वर्षाची थकबाकी १५००रुपये अधिक व्याज १२० रुपये व चालु वर्षाचे १५०० रुपये असे एकूण ३१२० रू पाणीपट्टी आकारली होती.सदरील नागरिकांना पाठविण्यात आलेल पाणीपट्टी शुल्क बेकायदेशीर असुन नवीन नळधराकांवर अन्याय करणारे आहे म्हणून ते रद्द करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागण्याचा इशारा अतुल पाटील यांनी दिला होता.

अतुल पाटील यांच्या मागणीनुसार पालिकेने दखल घेऊन थकबाकी सदराखाली देण्यात आलेली रक्कम १६२० रू कमी करण्यात आली असुन तसे पत्र अतुल पाटील यांना दिले आहे.सदर पत्रामध्ये विस्तारीत भागातील नवीन ३२८ नळधारकांना सन २०२१-२२ चे पाणीपट्टी शुल्क माफ करणेबाबत मा.प्रशासक न.पा.यावल यांनी मंजुरी देऊन मायनेट् प्रणाली सिस्टीममध्ये समायोजित करून माफ केलेले होते परंतु शासनाकडून नविन प्रणाली महा यू एल बी सिस्टीममध्ये माफ केलेले परिणाम दिसुन आले नाही म्हणून ३२८ नळ धारकांना मागील पाणीपट्टी व व्याज १६२० रू व चालु सन २०२३-२४ ची पाणीपट्टी १५०० रू असे एकूण ३१२० रू पाठविण्यात आले होते.ऑनलाईन प्रणालीमध्ये बदल झाल्याने सदरचे बिल चुकून पाठविले गेल्याचे पालिकेने मान्य केले असुन मागील थकबाकी सदराखाली देण्यात आलेले १६२० रू न पा ने नवीन प्रणाली महा यू एल बी सिस्टीममध्ये कमी करण्यात आले असुन आता फक्त सन २०२३-२४ या चालु वर्षाची पाणीपट्टी १५०० रू नागरिकांना भरावे लागेल असे म्हटले असुन तसे पत्र अतुल पाटील यांना देण्यात आलेले आहे.

विस्तारीत भागातील नवीन नळ धारकांना मागील थकबाकी या सदराखाली १६२० रू जास्तीची पाणीपट्टी पालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने आकारले होते व पालिकेची ही मागणी बेकायदेशीर होती.नवीन नळ धारकांना पाणीपट्टी बिल मिळाल्यानंतर जागरूक नागरिकांनी माझ्याशी संपर्क करून सदर बाब माझ्या निदर्शनास आणून दिली होती म्हणून मी तत्काळ पालिकेस पत्र देऊन अवगत केले त्यानुसार पालिकेने मायनेट प्रणाली ऐवजी महा यू एल बी प्रणाली सिस्टीम मध्ये सदर नळधारकांचा समावेश करुन तांत्रिक चुकीमुळे पाठविण्यात आलेली थकबाकी रक्कम रद्द केलेली आहे.सजग नागरिक यांचेमुळे हा प्रश्न प्रशासनासमोर मांडता आला व त्याला यश मिळाले.विस्तारीत भागातील ३२८ नळधारक यांचे प्रत्येकी १६०० रू रक्कम वाचवता आली म्हणून समाधानी असल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.