जुम्मा तडवी,पोलीस नायक
रावेर तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२१ ऑक्टोबर २३ शनिवार
तालुक्यातील खिरोदा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत संकल्पनाधारीत ग्रामपंचायत विकास आराखडा व शाश्वत विकास ध्येय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
तालुक्यातील खिरोदा येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाना अंतर्गत शाश्वत विकास ध्येय या विषयावर संकल्पनाधारित विकास आराखडा या संदर्भात दि.१९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २३ या तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.सदरील प्रशिक्षण शिबिरास प्रत्येक गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,आशावर्कर,बचतगट सी.आर.पी, जिल्हापरिषद शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला.दरम्यान प्रशिक्षक म्हणून जैन साहेब, महाले सर,नेहा गाजरे,नंदिनी पंत,योगिता लोखंडे यांनी प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतुल महाजन,प्राचार्य पंचायतराज प्रशिक्षण केंद्र खिरोदा यांनी केले.