Just another WordPress site

यावल येथे तत्कालीन शासनाच्या कंत्राटी भरती विरोधातील दुटप्पी धोरणाचा भाजपातर्फ जाहिर निषेध

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार

येथे तत्कालीन शासनकर्ता महाविकास आघाडीच्या कंत्राटी कामगार भरतीबद्दल घेतल्या दुटप्पी भूमिकेविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्यात सरकारमध्ये असतांना स्वतःच्या कार्यकाळात सुरू केलेल्या कंत्राटी भरतीविषयी आता विरोधात असतांना दुटप्पी भूमिका ठेवत राज्यातील तरुण मित्र मंडळीच्या भविष्याशी खेळणाऱ्या महाविकास आघाडीविरूध्द यावल शहरातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील भुसावळ टी पाँईटवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल पाटील,उमेश पाटील,जिल्हा परिषद माजी सदस्या सविता अतुल भालेराव,माजी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,भाजयुवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश फेगडे,तालुका सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपुत,भाजयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी,माजी तालुका अध्यक्ष डॉ.एन.जी.कोल्हे,ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे,भाजपा शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,पांडुरंग सराफ,व्यंकटेश बारी,भुषण फेगडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा मित्र मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.