यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार
तालुक्यातील एका गावातील स्वस्त धान्य दुकानाविषयी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज देऊनही अद्यापपर्यंत चौकशी का केली नाही ? या कारणावरून एकाने दारूच्या नशेत तहसिल कार्यालयात धिगांणा घातल्याप्रकरणी सुनील भालेराव यांच्या विरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की,येथील तहसिल कार्यालयात दि.२० ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान तालुक्यातील सौखेडासीम येथील सुनील नथू भालेराव यांनी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे गोदाम व्यवस्थापक वाय.डी.पाटील यांना दारूचे नशेत शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.यावेळी तहसील कार्यालयात तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक असल्याने व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सदरील व्यक्तिने घातलेला गोंधळ बघण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती.याबाबतची तक्रार गोदाम व्यवस्थापक वाय.डी.पाटील यांनी येथील पोलीस ठाण्यात दिल्यावरून सुनील भालेराव यांचे विरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.