यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ ऑक्टोबर २३ सोमवार
नवरात्री उत्सव म्हणजे नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान करण्याचा उत्सव होय त्यामुळे हा उत्सव सातपुडा पर्वताच्या पाडा वस्तीवर राहणाऱ्या आदिवासी गोरगरीब महिलांनी देखील साजरा करावा यासाठी शिवशंभू संघटनेच्या वतीने आदिवासी महिलांना नुकतेच साडी चोळीचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी संघटनेच्या युवती प्रदेश अध्यक्ष कविता पाटील व युवती विभागाच्या यावल तालुका अध्यक्ष दिव्या पाटील यांनी आदिवासी पाड्यांना जाऊन साडी चोळी भेट दिली.सणाच्या निमित्ताने आपल्याला एका सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन मिळालेल्या साडी चोळीमुळे गोरगरीब महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसून आले.दरम्यान वंचित महिलांना या उत्सवानिमित्त आपण साडी चोळी भेट दिली पाहिजे असा सामाजिक उद्देश समोर ठेऊन शिवशंभू संघटनेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत नवरात्रीच्या निमित्त आदिवासी पाडा गायरान येथील महिलांना साडी चोळी भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शिवशंभु संघटनेचे मयूर पाटील व कल्पेश पाटील आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.