यावल येथे राज्य शासनाच्या विविध विरोधी धोरणाविरूद्ध शैक्षणीक संघनाटनांच्या वतीने तहसीलसमोर धरणे आंदोलन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार
राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजना तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरण या निर्णयाच्या विरोधात यावल तालुक्यातील सर्व शैक्षणिक संघटना, तालुका मुख्याध्यापक संघ,तालुका माध्यामिक संघ,ज्युनिअर कॉलेज संघटना,तालुका शिक्षकेतर संघ,संस्थाचालक संघटना,तालुका प्राथमिक संघटना यांच्या वतीने यावल तहसीलदार कार्यालयासमोर नुकतेच एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी विविध शैक्षणीक संघटनेच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करणेबाबत धोरण रद्द करा,शाळांचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा,विविध विभागातील कंत्राटी करणाचा निर्णय रद्द करा,जुनी पेन्शन योजना लागू करा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष जयंत चौधरी,उपाध्यक्ष बाळू पाटील,मुख्याध्यापक व्हि.जी.तेली,तालुका टी.डी.एफ संघटनेचे अध्यक्ष किरण झांबरे,तालुका सचिव सुधीर चौधरी,उपाध्यक्ष अश्विनी कोळी,जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष नंदन वळीकार व नगरपालिका उच्च माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष के.टी.तळेले,प्रोटॉनचे गणेश काकडे,उपाध्यक्ष अजय पाटील,मुख्याध्यापक डी.व्हि.चौधरी,नितीन झांबरे,डी.व्हि.पाटील,एस.डी.पाचपोळे,समाधान भोई,संघटक के.जी. चौधरी,पप्पू वानखेडे,चेतन तळेले,प्रशांत सोनवणे,युवराज पाटील,चंद्रकांत चौधरी,एस.आर.सोनवणे,उर्दू संघटनेचे जलील अहमद,शेख मकसुद शेख ईब्राहीम,एस.एम.मोमीन,एस.के.खान,एच.ए.शेख,महिला पदाधिकारी सुधा पाटील,विजया पाटील,श्रीमती यु.डी.पाटील,श्रीमती आर.व्ही. चोपडे,श्रीमती एस.ए.वाणी,पी.एम.बडगुजर तसेच सर्वपदाधिकारी संघटनेचे सदस्य,शिक्षकेतर संघटना उपाध्यक्ष अनिल चौधरी,शिक्षक संघटनेचे फारूख सर बहुसंख्येने शैक्षणिक संस्थाचालक व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.