यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ ऑक्टोबर २३ मंगळवार
शेतकऱ्यांच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केन्द्र शासनाच्या माध्यमातुन सहकार मंत्राल्याचे स्वतंत्र गठन करून शेती व शेतकऱ्यांशी निगडीत संख्यांना विविध विकासाच्या व आर्थिक उन्नतीच्या योजना राबविण्यासाठी सहकार क्षेत्रासाठी विकासाचे दालन उघले असुन याचा फायदा संपुर्ण देशाच्या सहकार क्षेत्राला आणी आपल्या देशाचा केन्द्रबिन्दु असलेल्या शेतकऱ्यास होणार असल्याची माहीती यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा तालुक्यात अग्रस्थानी असलेल्या कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली आहे.तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या तोलकाटयाच्या लोकापर्ण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने कोरपावली मोहराळा मार्गावर उभारण्यात आलेल्या तोलकाटयाचे लोकापर्ण कार्यक्रम कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांच्या हस्ते तोल काटयाची पुजा करून व फित कापुन उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन अॅग्रोफ्युल्य फार्मर्स प्रोडूयुसर कंपनीचे संचालक ए.टी.चौधरी,वासुदेव पाटील,पराग शिंदे यांच्यासह कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल,कोरपावली उपसरपंच हमिदाबी पिरन पटेल,महेलखेडी उपसरपंच जयंत पाटील,मोहराळा विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन राजेन्द्र महाजन,मोहराळा ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदा महाजन,यावल येथील कृषी केन्द्राचे संचालक प्रशांत पाटील यांच्यासह पंचक्रोशितील शेतकरी व व्यापारीसह परिसरातील ग्रामस्थ कार्यक्रमास मोठया संख्येत उपास्थित होते.याप्रसंगी तोलकाटा लोकापर्ण ते संपुर्ण प्रक्रीयेत राकेश फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईस चेअरमन सुधाकर नेहते,सदस्य जयश्री नेहेते,दतात्रय महाजन,यशवंत फेगडे,वसंत महाजन,शरद पाटील,ललित महाजन,महेन्द्र नेहेते,ईमरान पटेल,सुलोचना जावळे,सिकंदर तडवी,मिलींद महाजन,विलास महाजन व महमंद पटेल यांनी अतिश्य मोलाची साथ दिल्यामुळेच आपणास या कामात यश मिळाल्याचे गौरव उद्द्गार चेअरमन राकेश फेगडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपास्थितांचे आभार संचालक मिलींद महाजन यांनी मानले.