डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑक्टोबर २३ गुरुवार
तालुक्यातील तावसे बुद्रुक ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सलोख्याने व सामंजसपणे सर्वांच्या एकमताने लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरील बिनविरोध निवडीने संपूर्ण जिल्ह्यातील राजकारण्यांसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.या निवडीचे परिसरात जोरदार कौतुक केले जात आहे.
सदरहू सरपंच पदासाठी रेखा किशोर चौधरी ह्या बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या आहेत तसेच तिन्ही वार्डातील सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याला यश आले आहे.यात वॉर्ड क्रमांक १ मधून संदिप संभु कोळी,राजेंद्र देविदास चौधरी,अलकाबाई मनोज चौधरी वॉर्ड क्रमांक २ मधून सुशिला प्रभाकर शिंदे,बन्सुबाई अनिल पाटील,धनराज भगवान चौधरी तर वॉर्ड क्रमांक ३ मधून संदिप डिगंबर पाटील,रेखा किशोर चौधरी व बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी हे बिनविरोध निवडून आले आहेत.ग्रामपंचायत निवडणूक ही विधानसभेपेक्षा कठीण असते व प्रचंड चुरशीची असते अशा कहाण्या आपण नेहमी ऐकत आलो आहोत.या निवडणुकांचा गावावर काय परिणाम पडतो? गावाचा काय फायदा किंवा तोटा होतो? हे सर्वांनी अनुभवले आहे या सर्व बाबींचा विचार करून व गावाचा विकास व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपून देखील निवडणुका रखडल्या होत्या.चोपडा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आज माघारीचा शेवटचा दिवस होता.शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक ३ मधील उमेदवार पत्रकार विनायक जगन्नाथ पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत गावाच्या विकासासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.तावसे बुद्रुक ग्रामपंचायतने इतिहास रचत सर्व जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे.
सदर बिनविरोध निवडणूक कामी विनायक प्रल्हाद चौधरी,कैलास गोकुळ चौधरी,भानुदास प्रल्हाद चौधरी,राजेंद्र देविदास चौधरी,विनायक गोकुळ चौधरी,बाळकृष्ण छगन चौधरी,नरेंद्र छगन चौधरी,अनिरुद्ध छगन चौधरी,देवानंद धनसिंग शिंदे (माजी उपसभापती पंचायत समिती चोपडा ),प्रभाकर धनसिंग शिंदे,ज्ञानेश्वर पुरुषोत्तम पाटील,बाळकृष्ण बळीराम पाटील,सुनील तापीराम पाटील,केसरसिंग झावरू पाटील, ज्ञानेश्वर भाईदास चौधरी आदींनी परिश्रम घेतले.