Just another WordPress site

वढोदा येथील रूपाली सोनवणे यांची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल उद्या नागरी सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ ऑक्टोबर २३ रविवार

तालुक्यातील वढोदा येथील राहणाऱ्या व ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळलेल्या माजी सरपंच डॉ.रुपाली प्रभाकर सोनवणे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तसेच चेतन अवधूत सोनवणे यांची गावच्या पोलिस पाटीलपदी निवड झाल्याने विविध मान्यवरांच्या उपस्थित उद्या दि.३० ऑक्टोबर सोमवार रोजी नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते तथा यावल तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांची कन्या डॉ.रुपाली सोनवणे यांनी पाच वर्ष ग्रामपंचायत सरपंच म्हणून समाजसेवा करून त्याचबरोबर एमपीएससीचा अभ्यास देखील केला परिणामी त्यांची महाराष्ट्रात महिला प्रवर्गातून पहिल्या क्रमांकाने पोलिस उपनिरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.तर त्यांचे बंधु कै.अवधुत सोनवणे यांचे सुपुत्र चेतन सोनवणे यांची पोलिस पाटीलपदी निवड झाल्याने याचे औचित्य साधून उद्या दि.३० ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेला नारायण आप्पा चौक वढोदा तालुका यावल येथे नागरी सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यस्थांनी जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी कैलास कडलग,फैजपुर पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे,सेवानिवृत्त पो.डी.वाय.एस.पी.राजेद्र रायसिंग,दिलीप सुर्यवंशी,जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे,डोबंवली येथील किशोर कोळी,यावलच्या तहसिलदार मोहनमाला नाझीरकर,यावल पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजूषा गायकवाड उपस्थीत राहणार असून उपस्थितीचे आवाहन तंटामुक्तगाव समितीचे अध्यक्ष उत्तम सोनवणे,सरपंच संदिप सोनवणे,वि.का.सो.चे व्हाईस चेअरमन नरेद्र सोनवणे,उपसरपंच गोपाल चौधरी सह ग्रामपंचायत सदस्य व वढोदा ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.