यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ नोव्हेंबर २३ बुधवार
भारताच्या एकता व अखंडतेचे प्रतिक मानले जाणारे महान स्वातंत्र सेनानी माजी गृहमंत्री लोहपुरुष स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन आज दि.१ नोव्हेंबर बुधवार रोजी यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे यावल तालुका शेतकी संघ सभागृहात अभिवादन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमेटी यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका सहकारी शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड यांच्या वतीने थोर नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.दरम्यान यावल तालुका शेतकी संघाचे व्यवस्थापक सुर्यकांत गजरे,काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष कदीर खान,कॉंग्रेस अनुसुचित जाती यावल तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे,विक्की गाजरे,विनोद सोनवणे,रामचंद्र भोईंटे,सुरेश यावलकर,अशोक गाजरे,नागोराव गाजरे यांच्यासह आदी मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.