Just another WordPress site

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ यावल येथे साखळी उपोषणाला सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ नोव्हेंबर २३ गुरुवार

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने काल दि.१ नोव्हेंबर २३ पासून येथील भुसावळ टी पॉइंटजवळ साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.प्रसंगी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव याठिकाणी एकवटले असून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे व जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत यावल येथे उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आला.

यावल शहरात भुसावळ टी पॉइंट येथे काल दि.१ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळपासून मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसी जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ यावल तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव एकत्र आले आहे व त्यांनी देखील साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.सदरील उपोषणामध्ये जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील,मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अजय पाटील,सचिव अतुल यादव,प्रसिद्धी प्रमुख सुनील गावडे,डी.बी.पाटील,प्रा.मुकेश येवले,प्रा.संजय पाटील,प्रा.संजय कदम,विलास पवार,राकेश पाटील,स्वप्निल चव्हाण,भास्कर पाटील,किरण पाटील,दिनेश पाटील,ऍड.देवकांत पाटील,प्रा.मुकेश येवले,रणछोड पाटील,डॉ.हेमंत येवले,दिनकर क्षीरसागर, डी.सी.पाटील,राकेश पाटील,रुपेश पाटील,वसंत पाटील,किरण पाटील,अजय पाटील,अनिकेत येवले यांच्यासह सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी साखळी उपोषणाला बसले आहे व जोपर्यंत मराठा समाजाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण कायम राहील असा पवित्रा यावल तालुका सकल मराठा समाज बांधवांनी घेतला आहे.सदर आंदोलनस्थळी तालुक्यातील सौखेडासीम,दहीगाव,चुंचाळे, किनगाव,साकळी,मोहराळे,विरावली,आडगाव,उंटावद,नायगाव येथील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.