यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ नोव्हेंबर २३ शुक्रवार
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण सध्या काही कालावधीकरिता स्थगित करण्यात आले असून याच उपोषणाच्या समर्थनार्थ यावल तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे.सदरील उपोषण स्थळी काल दि.२ नोव्हेंबर गुरुवार रोजी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल यांनी भेट देऊन मराठा समाजबांधवांसोबत आरक्षणाबाबत चर्चा करून या उपोषणास पाठिंबा दर्शविला.
मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील समर्थनात तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने यावल येथे साखळी उपोषण सुरू असून काल २ नोव्हेंबर गुरुवार रोजी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मराठा समाजबांधवांसोबत आरक्षणबद्दल चर्चा करीत आपला पाठिंबा जाहीर केला.यावेळी त्यांच्यासोबत कोरपावली सरपंच विलास अडकमोल,शिवसेना शाखाप्रमुख भरत चौधरी,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले,काँग्रेस युवानेते अमोल भिरुड,ज्येष्ठपत्रकार डी.बी. पाटील,पत्रकार सुनील गावडे,डॉ.हेमंत येवले,अमोल दुसाने,अरुण लोखंडे,दिनकर पाटील,बी.डी.पाटील,पवन पाटील,किरण पाटील,गोपाळ महाजन,दिनेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.