केंद्र शासनाच्या मदतीने अडीच हजार लाभार्थ्यांना साहित्य वाटप करून गाठला नवा उच्चांक
खा.नवनीत राणा व आ.रवीभाऊ राणा यांचा दिव्यांगांना मदतीचा हात
गोपाल शर्मा.पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.३ नोव्हेंबर २३ शुक्रवार
एकाच छताखाली हजारों दिव्यांगाना मदतीचा हात देऊन खासदार नवनीत रवी राणा यांनी नुकताच एक नविन उच्चांक गाठला आहे.यात तब्बल अडीच हजाराच्या वर दिव्यांगाना मोफत साहित्याचे वाटप त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.दरवर्षी अपंग,नेत्रहिन,मूकबधिर लोकांमध्ये आपली दिवाळीची शुरुवात करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी यावेळी जाहीर केले आहे की,आमच्या सततच्या पाठपुराव्याने मासिक मानधन ६०० रुपयावरुन १५०० रुपयाची वाढ केलेली असून आता महाराष्ट्रातील सर्व पात्र दिव्यांगाना १५०० रुपयावरुन ३००० रुपये मासिक मानधन करण्यासाठी प्रयत्न करणार असून सदरहू यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.त्याचबरोबर अमरावती जिल्हातील प्रत्येक तालुकास्तरावर देखील याप्रकारे दिव्यांगाना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाणार असून त्याकरिता दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे आवाहन खा.नवनीत राणा यांनी केले आहे.यावेळी खासदार नवनीत राणा अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालेल्या या ह्रदयस्पर्शी कार्यक्रमात कित्येक वेळा खासदार नवनीत राणा या अत्यंत भावूक झाल्या.प्रसंगी खासदार नवनीत यांनी आपल्या मायेचे हात दिव्यांगावर ठेऊन त्यांनी मातृत्वाचा आधार दिल्याने दिव्यांग बंधू भगीनी देखील भारावून गेले.यावेळी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते बॅटरीवरची गाडी,तिनचाकी सायकल,मोबाईल,नेत्रहिन यांना काठ्या, मूकबधिर यांना कर्ण यंत्र,अपंगाना कृत्रिम पाय,कुबड्या,व्हीलचेअर,वाकर्स इत्यादि साहित्य वाटप करण्यात आले.दरम्यान सामाजिक शिबिरा मध्ये एकूण ५५७० दिव्यांगानी नोंदणी केली होती.प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात केंद्रीय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनात राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे.आ.रविभाऊ राणा आमदार,सुनीलभाऊ राणा मुख्य मार्गदर्शक युवा स्वाभिमान पार्टी,दिव्यांग विभागाचे पी.डी.शिंदे,सामाज सेवक चंद्रकुमार जाजोदिया,पी.डी.गोटे,माजी नगरसेविका सुमती ढोके,भोसले साहेब,जिल्हा समाज कल्याण अधिकारी कस्तुरे साहेब,ज्योति सैरीसे,नितीन बोरेकर,अजय मोरया,गणेशदास गायकवाड,विनोद गुहे,नाना आमले,माजी नगरसेवक आशिष गावंडे,नाना आमले,विनोद गुहे,सचिन भेंडे,ऊमेश ढोने,प्रशांत कावरे,सत्येंद्रसिंग लोटे,अजय जयस्वाल,राजन आडतीया,धनंजय लोणारे,सुधीर लवणकर,विकी बीसणे,जैनुऊद्दीन जाफर,गणेशदास गायकवाड,निलेश भेंडे,अनुप खडसे,जयंतराव वानखडे,राजेश बनारसे,अजय देशमुख, गजूभाऊ नांदुरकर,लक्ष्मण लाटेकर,रोशनी लुचाईवाले,साक्षी उमक,कांचन कडू,नीता तिवारी,अवी काळे,पंकज शर्मा,मिलिंद काहाडे,शैलेंद्र कस्तुरे,समाधान वानखडे,अन्न कुंभलकर,किशोर पीवाल,समीक्षा गोटफोडे,लता आंबुलकर,वनिता तंतरपाळे,चदा लाडे,अर्चना तालन,अश्विनी झोड,संगीता तायडे,प्रतिभा महाजन,शोभा कीटके,पराग चीमोटे,अनिकेत जोशी,प्रेमा लव्हाळे,हरिहर गिरलकर,कमल किशोर मालानी,नितीन बोरकर,विजय जयस्वाल,गोपाल शर्मा युवा स्वाभिमान पार्टी अकोला दिव्यांग जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.