यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ नोव्हेंबर २३ मंगळवार
येथील पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात तालुक्यातील मारुळ येथील सरपंच सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांना तिन गावगुंडानी दारूच्या नशेत वाद घालून धार्मिक तेढ निर्माण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सदरील गावगुंडावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मारूळ येथील लोकनियुक्त सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदचे यावल तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे नुकतीच केली आहे.
याबाबत मारूळ सरपंच तथा महाराष्ट्र राज्य परिषदचे तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपण सरपंच या नात्याने गावातील ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कामाकरीता दि.३नोव्हेंबर रोजी यावल पंचायत समितीमध्ये आलो असता पंचायत समितीच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत उभे असलेले तिन अज्ञात गावगुंडानी माझा हात पकडून दादागिरी व दमदाटी करून मला म्हणाले तु कुठाला आहे व येथे काय करतो तुला जर इंथ यायचे असल्यास जयश्रीराम म्हणावे लागेल नाही म्हटल्यास तुला आम्ही जिवे ठार मारू अशी अपमानास्पद व धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची माझ्याशी हुज्जत घातली व माझ्याशी भांडण केले जी माणुसकीला काळीमा फासणारी बाब असुन या घटनेचा मी जाहीर निषेध करीत आहे.ग्रामपंचायतीच्या आणी संघटनेच्या कामाकरीता मला वेळोवेळी यावल पंचायत समितीच्या कार्यालयात यावे लागते तरी अशा प्रकारच्या हिन्दु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा हा प्रयत्न असुन वेळीच अशा गावगुंड प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी पंचायत समितीच्या आवारात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे जेणे करुन भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी मारूळचे सरपंच सैय्यद असद सैय्यद जावेद अहमद यांच्यासह पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.