Just another WordPress site

विद्युत डीपी बिघाडमुळे घरातील उपकरणे जळाल्याप्रकरणी त्यांना भरपाई द्यावी-अतुल पाटील यांची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार

शहरातील देशमुख वाडा,बस मळा परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे डिपीमध्ये बिघाड झाल्याने या क्षेत्रात राहणाऱ्या नागरीकांच्या घरातील दूरदर्शन संच,घरातील बल्ब व इतर वस्तु यातुन धुर निघु लागल्याने घराबाहेर येत नागरिकांनी एकमेकांना विचारपूस केली असता सुमारे शंभरचे आसपास घरातील संसार उपयोगी इलेक्ट्रिक उपकरणे जळाल्याची माहिती समोर आली आहे.परिणामी विद्युत डीपी बिघाडमुळे घरातील उपकरणे जळाल्याप्रकरणी त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की,रात्री पावणेनऊचे सुमारास शहरातील देशमुखवाडा भागातील बसमळा व तारकेश्र्वर मंदिर परिसरात अचानकपणे घरातील टीवी व बल्ब यांचेतून धुर निघु लागला व उपकरणे जळाल्याची घटना घडली.सदरहू नागरिकांनी घराबाहेर येत एकमेकांची विचारपूस केली असता अनेकांचे उपकरणे जळाली असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान परिसरातील रहिवासी दाऊ पहेलवान,पंकज पाटील व इतरांनी विद्युत वितरण कंपनीचे कार्यालयात धाव घेतली परंतु त्या ठिकाणी शहर अभियंता उपस्थीत नसल्याने सदरची घटना यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना कळविली.अतुल पाटील यांनी दखल घेऊन तत्काळ विद्युत वितरण कंपनीचे अभियंता वाघुलदे यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधुन या विषयाची माहिती दिली.यात यावल शहरातील रेणुकादेवी मंदिर परिसरातील डीपी क्र.१२ वरील न्युट्रल तार हाई व्होल्टेजमुळे तुटल्याचे निदर्शनास आले व त्यामुळेच उपकरणे जळाली असल्याची माहिती समोर आली असून तत्काळ डीपी बंद करून दुरुस्ती करण्यात आली.सदरील परिसरातील उपकरणे जळाली त्या भागातील नागरीक शेतकरी व शेतीवर अवलंबून असणारे आहेत तसेच हाय व्होल्टेजमुळे डीपीवरील न्युट्रल तार तुटल्याने ग्राहक यांचे नुकसान झाले आहे यास सर्वस्वी विद्युत वितरण कंपनी जबाबदार असल्याने त्यांनी रीतसर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली असून स्थानिक पातळीवर दाद न दिल्यास वरीष्ठ अधिकारी यांचेकडे अथवा ग्राहक न्यायालयात तक्रार करण्यात येणार असल्याचेही अतुल पाटील यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.