Just another WordPress site

ऑन द स्पॉट न्यूज-शासनाच्या “स्वच्छ भारत मिशन ” योजनेची तेल्हारा नगर परिषदकडून “ऐसीच्या तैसी”

तेल्हारा नगर परिषदेचे उच्चस्तरीय सीएजी ऑडिट करण्याची शहरवासीयांची मागणी

गोपाल शर्मा,पोलीस नायक

विदर्भ विभाग प्रमुख

दि.१३ नोव्हेंबर २३ सोमवार

दिवसेंदिवस तेल्हारा शहराची परिस्थिती चिंताजनक होत चालली असून तेल्हारा नगरपरिषद केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला हरताळ फासल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.नगर परिषदेचे स्वच्छ भारत मिशन अभियान फक्त पेपर बाजीपुरताच उरला आहे काय? अशी संतप्त प्रतिक्रिया तेल्हारा शहरातील नागरिकांकडून उमटत आहे.एकीकडे तेल्हारा शहरात मच्छरांमुळे डेंगू सारख्या जीवघेणा आजार पाय पसरत असून दुसरीकडे नगर परिषदेतील कामचुकार कर्मचारी तेल्हारा शहरातील नागरिकांकडून भरमसाठ टॅक्सची वसुली करूनही शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे शहरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.दिवसेंदिवस तेल्हारा नगर परिषदेचा भोंगळ कारभार हा सुधारणा एवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे याचे सर्व श्रेय नगर परिषदेतील काम चुकार कर्मचाऱ्यांना मिळत आहे.यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुठलेही नियंत्रण तेल्हारा नगरपरिषदमध्ये दिसत नसून तेल्हारा नगरपरिषदमध्ये मनमानी कारभार चालत असल्याची जोरदार चर्चा शहरवासियांमध्ये चर्चिली जात आहे.दिवसेंदिवस मच्छरांच्या संख्येत वाढ होत असून मच्छर धूर फवारणी यंत्रामुळे थातूरमातूर फवारणी केल्यामुळे लोकांना दिवसाही घरांमध्ये बसने कठीण झाले आहे. नागरिकांना मच्छर अगरबत्ती व मच्छर लिक्विड मशीन खरेदी करण्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.तेल्हारा नगर परिषदेचा कारभार दिवसेंदिवस भोंगळ होत चालला असून यामध्ये कोणतीही सुधारणा न होता समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. मोकाट डुकरे,गाढव व कुत्रे यांचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत असून देखील नगरपरिषद ही फक्त बघायची भूमिका घेत असल्याने शहर वासियांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान वरिष्ठ अधिकारी काय झोपलेले आहेत काय? कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित का करत नाही ? केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला तेल्हारा नगरपरिषदेने हरताळ फासले असल्याची चर्चा तेल्हारा शहरात चर्चिली जात असून केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारला घरचा आहेर तेल्हारा नगर परिषदेने दिला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया तेल्हारा शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तेल्हारा शहरात केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर तसेच महाराष्ट्र सरकारच्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांचे कार्यालयासमोर  घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले असून हीच परिस्थिती सम्पूर्ण शहरात पाहायला मिळत आहे व त्यामुळे तेलारा शहरात मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.परिणामी तेल्हारा नगरपरिषदेचा भोंगळ कारभार “स्वच्छ भारत मिशन”अभियानाचा बोजवारा उडाल्यामुळे शहरवासींसमोर समोर आला असून सदरील नगरपरिषदेने केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारला घरचा आहेर दिला आहे की काय? हा मोठा चर्चेचा विषय शहरवासियांमध्ये बनला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तेल्हारा नगरपरिषदवर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे तेल्हारा शहरात नगर परिषदेचा वाली कोण ? वरिष्ठ अधिकारी तेल्हारा नगर परिषदेतील कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित का करत नाही ? वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी हप्ता दिला जातो काय ? यासाठी वरिष्ठांची चौकशी होणे गरजेचे आहे अशी संतप्त चर्चा तेल्हारा शहरात चर्चिली जात आहे.तेल्हारा शहरात नाल्यामध्ये कचरा,मच्छरांचा हैदोस,मोकाट जनावर,गाढव,डुक्कर व  कुत्रे यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून तेल्हारा शहर नगरपरिषद मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरत आहे. नागरिकांकडून टॅक्सची भरमसाठ वसुली करून शहरातील नागरिकांना सुविधा देण्यात असमर्थ ठरत असल्यामुळे शहरातील नागरिकांना जर सुविधा देण्यास तेल्हारा नगर परिषद असमर्थ ठरत आहे तर घर टॅक्स का द्यावा ? तेल्हारा नगरपरिषदेची स्वच्छ भारत मिशन अभियान फक्त कागदोपत्री पेपर बाजीपुरतीच उरली आहे काय ? अशी संतप्त प्रतिक्रिया तेल्हारा शहरात आहे.महाराष्ट्र सरकारने तेल्हारा नगरपरिषदेचा सीएजी ऑडिट करण्याची वेळ आज आलेली आहे.तेल्हारा शहरातील सिमेंट रोडची झालेली दुरावस्था नागरिकांना येणे जाण्यास होणारा त्रास तसेच सिमेंट रोडवर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग व्यक्ती व सर्वसाधारण नागरिकांना त्रास होत आहे.तेल्हारा शहरातील नागरिकांकडून नगर परिषदेने भरमसाठ कर वसुली करून गोळा करण्यात येणारी रक्कम ही तेल्हारा शहरातील नागरिकांसाठी खर्च न करता मनमानी करून दुसरीकडेच उधळपट्ट्या करत आहे की काय? याची चौकशी होण्याची गरज निर्माण झालेली असल्याने तेल्हारा नगर परिषदेचे  सीएजी ऑडिट व्हायला पाहिजे जेणेकरून सीएजी ऑडिट केल्यामुळे सत्य जनतेसमोर येईल अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे.तेल्हारा नगर परिषदेच्या फोनवरील कारभारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून याचे सर्व श्रेय नगरपालिकेतील कामचुकार  कर्मचाऱ्यांना मिळत आहे व त्यांच्या कृपेमुळेच आज तेल्हारा शहरात मच्छरांचा हौदोस मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.जिल्ह्यात आज डेंगू सारखा जीवघेणा आजार डोके वर काढू पहात असून वरिष्ठ अधिकारी काय झोपा काढत आहे की काय ? याला जबाबदार कोण आहे ? याची चौकशी होणे आज गरजेचे असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहर वासियांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.