Just another WordPress site

आमदार बच्चु कडू यांच्या पाठपुराव्याने यावल नगरपरिषदेला साडेसहा कोटीचा निधी मंजुर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ नोव्हेंबर बुधवार

येथील शहरातील विविध भागातील रस्ते व विकास कामासाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा भुसावळ नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे प्रयत्नाने व आमदार बच्चू कडू यांचे मंत्रालयात सततच्या झालेल्या पाठपुराव्याने नगर विकास मंत्रालयाकडून साडे सहा कोटी रुपयाचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे.यावल नगरपालीका कार्यक्षेत्रातील गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या विकास कामासाठी निधी मंजूर झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील तारकेश्वर मंदिरा लगतची संरक्षण भिंत बांधणे ८० लक्ष रुपये,बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्त्याचे डांबरीकरण व कॉन्क्रीट दुभाजक बांधणे यासाठी एक कोटी रुपये,व्यास नगर,पांडुरंग सराफ नगर व स्वामी समर्थ नगर मधील रस्ते यांचे डांबरीकरण करणे एक कोटी रुपये,आयशानगर प्रभूलीला नगर व स्वामीनारायण नगर या वस्त्यांमध्ये रस्त्याचे डांबरीकरण तथा गटारीचे कॉंक्रिटीकरण करणे यासाठी एक कोटी ७० लाख रुपये,श्री गजानन महाराज मंदिर परिसर,बाबा नगर,एकविरा नगर,रजा नगर रस्त्याचे डांबरीकरण व गटारीचे काँक्रिटीकरण करणे एक कोटी रुपये,नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक ७०९,७१०,व ७१२ मध्ये रस्ते डांबरीकरण व साईड गटारी बांधणे ५० लाख रुपये, डांगपुरा कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे ५० लक्ष असे सहा कोटी ५० लाख रुपयांचा निधी शहरासाठी मिळाला असून शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही लवकरच लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असुन ही आचारसहींता लागणे आधीच या निधीतील विकास कामे व्हावी याकरिता शहरातील क्षेत्र व विस्तारीत भागातील विविध वस्त्यामधील विकास कामासाठी निधी मंजूर झालेला आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.परिणामी लोकसभा निवडणूकीआधीच शहरातील विकासकामे गतीने व्हावीत अशी अपेक्षा येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह यावल शहर वासीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.