यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ नोव्हेंबर २३ बुधवार
सद्या महसुल प्रशासन दिवाळीच्या सुट्टीवर गेल्याने संधीचा फायदा घेत येथील सातोद मार्गावरील तहसीलच्या नवीन प्रशासकीय ईमारती समोरील कार्यालयाच्या आवारातुन अज्ञात चोरट्याकडून अवैद्य वाळूच्या वाहतुकीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले डंपर चोरीचा प्रयत्न करण्यात आला असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,यावल शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारातत वाळू चोरीच्या वाहतुक गुह्यात महसुल यंत्रणेकडून जप्त करण्यात आलेले डंपर क्रमांक एमएच ४० वाय ५११ हे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन दि.१४ नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी ८ ते ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याकडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला.याबाबत यावल पोलीस ठाण्यात तालुक्यातील कोळवद येथील कोतवाल सोनुसिंग सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.न. ५७६ / २०२३भादवी ३७९ व ५११ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हॅड कॉस्टेंबल राजेन्द्र पवार हे करीत आहे.