Just another WordPress site

जलीलदादा पटेल यांची मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात “एंट्री”

जळगाव (प्रतिनिधी) :-

दि.१५ नोव्हेंबर २३ बुधवार

महाराष्ट्र काँग्रेस निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे प्रदेश सरचिटणीस जलीलदादा पटेल यांनी काल दि.१४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या आदेशानुसार मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २३-२४ साठी १७९-नेपानगर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार गेंदूबाई चौहान यांच्या प्रचारार्थ “एंट्री” करून पक्ष विकासाकरिता बांधील असल्याचे दाखवून दिले आहे.

दरम्यान काँग्रेस निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे प्रदेश सरचिटणीस जलीलदादा पटेल यांनी काल दि.१४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या आदेशानुसार मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २३-२४ दरम्यान १७९-नेपानगर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार गेंदूबाई चौहान यांच्या प्रचारानिमित्ताने वार्ड क्र.१० येथील शिवाजीनगर व एकता कॉलनी येथे प्रचार करीत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व गेंदूबाई चौहान यांना विजयी करण्याचे मतदार बंधू बघिणींना आवाहन केले.यावेळी त्यांच्या समवेत नेपानगरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भारतीताई विनोद पाटील,डॉ.विनोद पाटील,प्रकाशसिंग बैस,नगरसेविका रुपाली सावकारे,अपसार खान,अनिशा राजेंद्र पटेल,राजू पाटील यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.