जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
१८ नोव्हेंबर २३ शनिवार
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ नोव्हेंबर शनिवार रोजी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरहू यानिमित्ताने तालुक्यातील सांगवी येथे यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.१७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी नुकतेच नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी सदरील संविधान बचाव रॅलीमध्ये संविधान प्रेमी व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे यांच्या वतीने करण्यात आले.
दि.२५ नोव्हेंबर शनिवार रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रोजी सर्व वंचित बहुजन आघाडीतील गाव,तालुका व जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांनी “संविधान बचाव रॅली” मध्ये सहभागानिमित्ताने एक दिवस अगोदर नियोजन करण्याकरिता दि.२४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सर्वांनी उपस्थित राहायचे असून आपला प्रत्येकाचा सहभाग देऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करायचे आहे.यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार व आदेशानुसार प्रत्येक तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांना विनंतीपूर्वक बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले होते.त्या अनुषंगाने यावल तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.१७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी नुकतेच नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कुलदीप मेघे,दीपक मेघे,सुचित मेघे,अँड.गोकुळ सोनवणे,योगेश सोनवणे,वंचित शाखा अध्यक्ष विजय मेघे, राजेंद्र बारी,बाबूलाल पाटील,धीरज मेघे,अजय मेघे,अमोल तायडे,आनंद तायडे,आनंद सर,कोमल सर,अमोल तायडे,भूषण तायडे,विकास तायडे,आकाश सोनवणे,रोशन सोनवणे,रोहित सोनवणे,रीतीक सोनवणे,सागर मेघे,वैभव तायडे,विवेक मेघे,आदर्श सोनवणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.