Just another WordPress site

लोकनाटय तमाशा मंडळच्या मंडपास लागलेल्या विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू तर एक जखमी

सादिक शेख,पोलीस नायक

मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२३ नोव्हेंबर २३ गुरुवार

तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस ठाणे हद्दीतील पान्हेरा गावात काल दि.२२ नोव्हेंबर बुधवार पासून बेलदार समाजाच्या कानू सती माता यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेत आनंद लोकनाट्य मंडळ जळगाव (खान्देश) येथील तमाशा पथक मनोरंजनासाठी आले असता काल दि.२२ नोव्हेंबर रोजी  मंडप उभारतांना लोखंडी रॉड विजेच्या तारांवर आदळल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून यात्रेदरम्यान एकच शोककळा पसरली आहे.

दरम्यान पान्हेरा गावातील कानू सती मातेच्या दर्शनावेळी तमाशा आनंद लोकनाट्य मंडळाच्या मनोरंजनासाठी पिंडल उभारतांना लोखंडी पाईपचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने नाट्य मंडळात काम करणाऱ्या दोन मजुरांना आपला जीव गमवावा लागला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.सदरील विजेचा जोरदार शॉक लागून अंकुश वायाळ नारायणगाव तहसील सिन्नर जिल्हा पुणे आणि विशाल गणेश भोसले राजूर गणपती तहसील भोकरदन यांचा मृत्यू झाला असून राहुल शंकर जाधव राहणार मुंबई हा गंभीर जखमी झाला आहे.सदर घटनेनंतर तिघांनाही धामणगाव बधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.