प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की,प्रकाश आंबेडकर हे बॅरिस्टर असून त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की भारताच्या संविधानाचा मूळ गाभा कुणालाच बदलता येत नाही.कुणालाच म्हणजे कुणालाच नाही.संविधानात तशी तरतूदच नाही त्यामुळे संविधान बदलणार हा एक निवडणुकीतील जुमला आहे.कुणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही.निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात.अर्ध्या लोकांचे ‘संविधान बदलणार’ असे सुरू होते तर अर्ध्या लोकांचे ‘मुंबई तोडणार’ असे चालू होते.आता हे वारंवार ऐकावे लागेल परंतु मुंबई कुणी तोडू शकत नाही किंवा संविधान कुणी बदलू शकत नाही.दरम्यान संविधान सन्मान महासभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की,वंचित बहुजन आघाडीने संविधानाच्या समर्थनार्थ ही चर्चा सुरू केली असून काँग्रेस पक्षानेही येत्या कालावधीत दुसऱ्या राज्यात संविधानाची चर्चा सुरू करावी.सार्वजानिक सभा घ्याव्यात.काहीजण संविधान बदलू इच्छित आहेत त्यांना माझे विचारणे आहे की,तुम्हाला संविधान का बदलायचे आहे? संविधान बदलण्याच्या अगोदर आपण ठरवतो की नवीन काय येणार आहे पण एवढेच सांगितले जात आहे की हे संविधान आता जुने झाले आहे.आता न चालण्यासारखे झाले आहे म्हणून बदलले पाहिजे त्यामुळे याचा विचार करणे आवश्यक आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.