Just another WordPress site

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल !

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथराव खडसे यांचा दावा

जळगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे.त्यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल असा दावा एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.यादरम्यान एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार बदलू शकतात असे वक्तव्य केले आहे.यावेळी राज्याच्या राजकीय निर्णयांमध्ये शरद पवारांचा सहभाग असल्यामुळे अनेक निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागले असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.शरद पवारांनी बैठका घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना व काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता आणली होती याची देखील आठवण खडसे यांनी यावेळी करून दिली.

तसेच शिंदे गटाचे ५० आमदार अस्वस्थ असल्याचा दावाही एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये मंत्रिपद मिळण्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत.त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे.आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल.त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा दावा एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.