गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.२९नोव्हेंबर २३ बुधवार
हनुमान चालीसा ट्रस्ट व आमदार रवीभाऊ राणा तसेच खासदार नवनीतजी राणा यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय शिवकथा वाचक श्री. प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराणसाठी मुख्य संपर्क कार्यालय व मदत केंद्राचे “श्री शिवाय नमो स्तुभ्यम” च्या जयघोषात मोठ्या थाटात नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
प्रसंगी २६/११ च्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिक व विर शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहून आणि सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी जगतगुरू राजेश्वर माऊली सरकार,साई गौतम लालजी,शक्ती महाराज, शिवानंद पुरी महाराज,प्रेमानंदजी गिरी महाराज,नंदा दीदी,कुळाचार्य कारंजेकर बाबा,आचार्य संतोषजी देशमुख महाराज आदी संत महत यांच्या प्रमुख उपस्थितीत चांडक कॉम्प्लेक्स राजकमल चौक अमरावती येथील कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रसंगी खासदार नवनीतजी राणा,खासदार डॉ.अनिलजी बोंडे,आमदार रवीभाऊ राणा,आमदार प्रताप अडसड,माजी आमदार जगदीश गुप्ता,पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,मनपा आयुक्त देविदास पवार,चंद्रकुमार जाजोदीया,नीलकंठराव कात्रे,शैलेंद्रजी कस्तुरे,प्रशांत देशपांडे,बाबासाहेब राऊत,सुदर्शन गांग,डॉ.गोविंद कासट,विनोद कलंत्री,सुधा तिवारी,सुमती ढोके,जितु दुधाने,संजय हींगास्पुरे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार नवनीतजी राणा व आमदार रवीभाऊ राणा यांनी संतपुजन करून आशीर्वाद घेतले.तर आपला धर्म आपली संस्कृती हा आपला अभिमान असून अंबानगरी अमरावतीमध्ये प्रदिपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण ऐकन्यासाठी लाखो स्त्री पुरुष भक्त मोठ्या उपस्थित राहणार असून येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे आत्मीयतेने स्वागत करणे हे प्रत्येक अमरावती करांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीतजी राणा यांनी केले तसेच हा कार्यक्रम केवळ हनुमान चालीसा ट्रस्टचा नसून संपूर्ण अमरावती जिल्हावासियांचा असल्याचे सांगून या धार्मिक आयोजनात प्रत्येक शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार रवीभाऊ राणा यांनी यावेळी केले.सदरहू या कार्यालयातून शिवभक्तीचा जागर व्हावा व आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवा असा आशीर्वाद संत मंडळींनी यावेळी दिला.खासदार डॉ.अनिल बोंडे,आमदार प्रताप अडसड व माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी आपल्या परीने या कार्यक्रमात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देवून आमदार रवीभाऊ राणा व खासदार नवनीतजी रवीभाऊ राणा यांच्या या धार्मिक आयोजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकुमारजी जाजोदीया व सुधा तिवारी यांनी तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष जितु दुधाने यांनी केले तसेच विनोद गुहे यांनी विविध समिती प्रमुखांचा परिचय करून दिला.कार्यक्रम यशस्वितेसाठी सुनीलभाऊ राणा मुख्य मार्गदर्शक,अजय मोरया,वीरेंद्र उपाध्याय,सुमती ढोके,नितीन बोरकर,सचिन भेंडे,श्याम शर्मा,सिमेश श्रॉफ,बाळूभाऊ इंगोले,संजय मुनोत,शंकर डोंगरे,अमोल कोरडे,सूरज मिश्रा,शुभ साहू,शेखर काळे,किशोर पिवाल,संदीप गुल्हाने,आशिष कावरे,हर्षल रेवने,सतीश मंत्री,गोपालभाऊ चांडक,अविनाश काळे,भूषण पाटणे,अनुप अग्रवाल,निलेश भेंडे,अनुप खडसे, जयप्रकाश लढ्ढा,सारिका म्हाला,साक्षी उमक,वंदना जमनेकर,लताजी अंबुलकर,अश्विनी झोड,खुशालजी गोंडाणे,पवन केशरवाणी,विनोद येवतिकर,विक्की बिसने,अमोल कोरडे,किरण श्रीराव,गोपाल शर्मा आदींनी परिश्रम घेतले.