Just another WordPress site

तेल्हारा नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करण्याची शहर वासियांची मागणी

गोपाल शर्मा,पोलीस नायक

विदर्भ विभाग प्रमुख

दि.२९ नोव्हेंबर २३ बुधवार

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान” या महत्त्वाकांक्षी योजनेचा तेल्हारा नगरपरिषदेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे सत्यानास व बट्ट्याबोळ होत असल्याचे चित्र तेल्हारा शहरात शहरवासीयांना पाहायला मिळत आहे.एकीकडे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील नागरिकांना स्वच्छ परिसर रहावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व वर्तमानपत्राच्या माध्यमातून तसेच टेलिव्हिजनच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून स्वच्छता अभियानाची माहिती देत आहे तर दुसरीकडे तेल्हारा नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचे कारणामे थांबण्याचे नाव घेत नसून तेल्हारा नगर परिषदेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांच्या कृपेमुळे या योजनेचा सत्यानास होत असल्याचे चित्र तेल्हारा शहरात दिसत आहे.

यात संत तुकाराम चौकापासून बस स्थानकापर्यंत या नाल्याचे निकृष्ट प्रकारचे बांधकामामुळे नाल्याचे भिंतींची पडझड झालेली असून या नाल्याच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.या नाल्याची कोणत्याही प्रकारची साफसफाई न केल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सदरील नाल्यामध्ये घाणीचे पाणी व कचरा साचल्यामुळे तसेच येथील नाल्याची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे येथे मच्छरांची संख्या मोठ्या प्रमाणात  वाढलेले असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दिवसेंदिवस तेल्हारा शहरांमध्ये मच्छरांच्या संख्येत वाढ होत असून तेल्हारानगर परिषदेतील कामचुकार कर्मचाऱ्यांच्या कृपेमुळे घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र शहरवासीयांना पाहायला मिळत आहे.तेल्हारा शहरांमध्ये मच्छरांची संख्या वाढल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.यात तेल्हारा नगर परिषदेतील कामचुकार कर्मचाऱ्यांकडून शहरात थातूरमातूर मच्छरांची धूर फवारणी करून सारवासारव केली जात असून सदरील मच्छरांचा बंदोबस्त करण्यात ते कमी पडत आहे.सदरहू मच्छरांपुढे तेल्हारा नगर परिषदेने लाचारी पत्करली आहे की काय ? असा प्रश्न येथील शहरवासियांमध्ये उपस्थित केला जात आहे.याबाबत लोकप्रतिनिधी यांनी तेल्हारा नगरपरिषदच्या चाललेल्या भोंगळ कारभाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान वरिष्ठांचा कुठलाही नियंत्रण तेल्हारा नगरपरिषदमध्ये दिसत नसून तेल्हारा नगर परिषदेचा वाली कोण ? तेल्हारा नगरपरिषदमध्ये चालते सिर्फ “मेरी मर्जी ” मै चाहे जो करू,मै चाहे वो करू ” मेरी मर्जी ” अशी परिस्थिती शहरवासीयांना सध्या तेल्हारा नागरपरिषदेमध्ये पाहायला मिळत आहे.यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुठलेही नियंत्रण तेल्हारा नगरपरिषदेत दिसत नसून वरिष्ठ अधिकारी कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी का घालत आहे ? त्यांना निलंबित का करत नाही ? तसेच तेल्हारा नगर परिषदकडून स्वच्छ भारत योजना फक्त “कागदी घोडे “नाचवत राबविली जात असल्याची जोरदार चर्चा तेल्हारा शहरात चर्चिली जात आहे.

एकीकडे तेल्हारा शहरात स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजले असून वरिष्ठ अधिकारी तेल्हारा शहरातील नगर परिषदेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्यामुळे शहरवासियांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.त्याचबरोबर तेल्हारा शहरात मोकाट कुत्रे,गाढव व  डुकरे यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहत असल्याने मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही व जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण ? मोकाट जनावरांचा बंदोबस्त ही तेल्हारा शहरातील नगरपरिषदेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गलेलठ्ठ पगार घेऊनही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बसून का झोपा काढत आहेत काय ?तेल्हारा नगरपरीषदेचे कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का करत नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया शहरात उमटत आहे.”आग लगे बस्ती मे,अपने रहना मस्ती मे “ही म्हण वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खरी ठरत आहे की काय ? वरिष्ठ अधिकारी कार्यालयांमध्ये बसून झोपा काढत आहेत काय ? वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याची गरज आहे असून तेल्हारा नगर परिषदेची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी करण्याची गरज आहे.सदरील चौकशी केल्यावरच सत्य जनतेसमोर येईल अशी संतप्त प्रतिक्रिया तेल्हारा शहरात चर्चिली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.