डॉ.सतीश भदाणे,पोलिस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१ डिसेंबर २३ शुक्रवार
डॉ.अनिल शिंदे सहायक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील वडती येथे आज दि.१ डिसेंबर शुक्रवार रोजी गर्भपरीक्षण,वांजपणा निवारण,जंत निर्मूलन तसेच ३० ते ४० जनावरांचे परीक्षण करण्यात आले.याकामी पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रिया बागडे,डॉ.सतीश भदाणे, डॉ.विलास साळुंखे,डॉ.सुनील बारेला,डॉ.बनकर,गोपाल मराठे,धरमचंद पाटील यांनी परिश्रम घेतले.प्रसंगी डॉ.प्रिया बागडे यांनी जनावरांचे आहार,जनावरांचे लसीकरण,मिनरल मिक्चर,माजाचा काड,योग्य रेतन करण्याची वेळ याविषयी माहिती दिली.यावेळी सर्व दूध उत्पादकांना आपल्या अमूल्य पशुधनाकरिता वंध्यत्व निर्मूलनाकरिता वडतीकरांनी सक्रिय सहभाग घेतला.सदरील पशु वंध्यत्व निवारण शिबीर पशुसंवर्धन विभाग जळगाव महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात आले.
त्याचबरोबर तालुक्यातील हातेड पशुवैद्यकीय दवाखानेअंतर्गत गणपुर येथे देखील आज दि.१ डिसेंबर शुक्रवार रोजी अंदाजे ६० ते ७० जनावरांवर वंधत्वनिवारण परीक्षण करण्यात आले.याकामी पशुधन विकास अधिकारी डॉ.संतोष कणके,गोपाल महाजन,साहिल बाविस्कर, राज पाटील,मनोज महाजन यांनी शिबिर घेण्यात सहकार्य केले.तसेच आज रोजी पशुवैद्यकीय दवाखाना अडावद येथे डॉ.अनिल शिंदे सहायक उपायुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा व डॉ.दीपक निकम,डॉ.तेजभूषण चौधरी,रमण बाविस्कर,निखिल सुलताने यांनी १६ ते १७ जनावरांवर वंध्यत्व निवारण व जंत निर्मूलन बाबत तपासणी करून पशुपालकांना लाभ देण्यात आला.प्रसंगी डॉ.अनिल शिंदे सहाय्यक उपयुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा यांनी तालुक्यातील दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त वांझ जनावरांचा शिबिरात लाभ घेण्याचे आवाहन केले.सदरहू चोपडा तालुक्यातील १ डिसेंबर २३ ते १९ डिसेंबर २३ पर्यंत एकूण ७५ वंध्यत्व शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याने सदरील पशु वंध्यत्व निवारण शिबिराचा सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अनिल शिंदे सहाय्यक उपयुक्त पशुसंवर्धन विभाग चोपडा यांनी केले आहे.