गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.३ डिसेंबर २३ रविवार
करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र उज्जैन स्थित प्रभू श्री महाकाल दरबारात काल दि.२ डिसेंबर शनिवार रोजी आमदार रवीभाऊ राणा व खासदार नवनीत रवी राणा यांच्याद्वारा हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित तसेच आमदार रवीभाऊ राणा,खासदार नवनीत रवी राणा व चंद्रकुमार जाजोदिया यांच्या वतीने महाकाल मंदिरात कलशपुजन,अभिषेक व महाआरती करून शिव हनुमान भक्तीचा जागर तसेच कलश स्थापना करण्यात आली.
दरम्यान काल दि.२ डिसेंबर शनिवार रोजी आमदार रविभाऊ राणा व खासदार नवनीत रवी राणा हे उज्जैन शहरात दाखल होताच लालगेट चौकात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत उज्जैनवासी नागरिकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.तर मंदिर प्रशासन व पुजारी मंडळाच्या वतीने श्री महाकाल मंदिरात आमदार रवीभाऊ राणा यांचा सत्कार करण्यात आला.आमदार रवीभाऊ राणा खासदार नवनीत रवी राणा यांनी श्री रामजन्मभूमी व हनुमान गढी अयोध्या येथून आणलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे प्रभू श्री महाकाल चरणी नतमस्तक होवून विधिवत पूजन केले व कलश डोक्यावर घेवून मंदिर परिक्रमा करणात आली तदनंतर पायदळ कलशयात्रा हरिसीध्दी माता मंदिर परिसरात आली.यावेळी भक्ती शक्ती रथाचे विधिवत पूजन पुजारी,संत महंत यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी आमदार रवीभाऊ राणा व खासदार नवनीत रवी राणा यांनी उपस्थितांना पंडित प्रदिपजी मिश्रा यांच्या उपस्थितीत अमरावती मध्ये १५ डिसेंबरला संपन्न होणाऱ्या भव्य कलश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.सदरील रथ उज्जैन,इंदोर,ओंकारेश्वर खंडवा मार्गे अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे प्रवेश करणार असून पुढे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा,अचलपूर,परतवाडा,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,भातकुली,चांदूर बाजार तसेच तिवसा आदी तालुक्यात फिरून दि.१५ डिसेंबर रोजी अमरावती शहरात दाखल होईल व मुख्य कलशयात्रेत सामील होईल.सदरहू ज्या महिला या कलशयात्रेत सहभागी होतील त्यांची कथास्थळी विशेष सन्मानपूर्वक स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली जाईल अशी घोषणा खासदार नवनीत रवी राणा यांनी करताच उपस्थित मातृशक्तीने टाळ्यांचा कडकडाट केला.आमदार रवीभाऊ राणा,खासदार नवनीत रवी राणा व चंद्रकुमारजी जाजोदीया यांनी या भक्ती शक्ती रथाला भगवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष जितु दुधाने यांनी केले.
यावेळी आमदार रवीभाऊ राणा,खासदार नवनीत रवी राणा यांच्यासमवेत समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लपी जाजोदीया,बबलू गुरु,गौरव गुरु, राजेश गुरु,संतोष ककडरिया,वेदकुमार,गोपाल पनपालिया,दिनेश सेठीया,जितु दुधाने,अजय मोरया,जयश्री मोरया,अनिता जाजोदीया,अचीत चंद्रकुमार जाजोदिया,अविनाश काळे,संदीप ससे,खुष उपाध्याय,अविनाश तापडिया,अनुप अग्रवाल,निलेश भेंडे,अनुप खडसे,अंकुश मेश्राम, संजय पनपालिया,दुर्योधन जावरकर,राजेश वर्मा,नितीन यादव,अजय देशमुख,मंगेश कोकाटे,किरण श्रीराव,अमोल कोरडे,किशोर पिवाल, अंकुश गोयंका,राहुल बजाज,महेंद्र तुंडलयात,पवन केशरवाणी,सूरज मिश्रा,वैभव गोस्वामी,निलेश कुलकर्णी,दुर्योधन जावरकर,राजेश वर्मा, अजय देशमुख,मंगेश कोकाटे,विठ्ठल ढोले,अमोल कोरडे,किरण श्रीराव,निलेश देशमुख,अंकुश मेश्राम,अजय बोबडे,शुभम उंबरकर,लकी पिवाल,राहुल काळे,पंकज आळसपुरे यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.