यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ डिसेंबर २३ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अनिल घनःश्याम चौधरी यांचे जेष्ठ बंधू तसेच अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचा सेवानिवृत्त शिक्षिका यमुना चौधरी यांचे पती प्रकाश घनःश्याम चौधरी वय (७२ वर्षे) यांचे काल दि.२ डिसेंबर रविवार रोजी रात्री २ वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,एक बहीण,पत्नी,मुलगा असा परिवार आहे.सर्वसामान्यांमध्ये वावरणारे वक्तिमत्व अशी ओळख प्रकाश चौधरी यांची होती.त्यांच्या निधनाबद्दल गावात एकच शोककळा व्यक्त केली जात आहे.
प्रकाश घनःश्याम चौधरी यांची अंतयात्रा आज दि.३ डिसेंबर रविवार रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे असे त्यांचे लहान भाऊ अनिल चौधरी यांनी कळविले आहे.